Pune Crime News : लग्न करण्याचे आमिष दाखवत 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 9 वर्षांनी विशेष न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. नामदेव बाळासाहेब वाघमोडे असे त्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने पुणे पोलिसांकडे याबद्दल खोटी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात हा सर्व धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


पीडित मुलीने आरोपीला ओळखत नसल्याची दिली कबुली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2013 रोजी एका महिलेने पुणे पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी त्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सरकारी पक्षाकडून दोन साक्षीदारांची चौकशी केली होती. यावेळी पीडित मुलीने आरोपीला ओळखत नसल्याचे न्यायलयाला सांगितले. 


आरोपीवरचा गुन्हा सिद्ध झाला नाही


आईसोबत भांडण झाल्याने मी रागाच्या भरात मावशीकडे निघून गेली, अशी साक्ष तिने दिली. यामुळे आरोपीवरचा गुन्हा सिद्ध करता आला नाही. यावेळी ॲड. राकेश सोनार यांनी आरोपीची बाजू न्यायालयात मांडली. अँड. राकेश सोनार यांनी युक्तिवाद करताना सदरच्या प्रकरणात फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून गावातील किरकोळ जमिनीवरुन वाद होता. त्या वादाचा संदर्भ घेऊन आरोपीवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोस्को कायद्यातंर्गत आणि पुरावे आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा युक्तिवाद गृहीत धरुन न्यायालयाने सदर आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 


आरोपीची निर्दोष मुक्तता


या आरोपीची भा.दं.वि. 363, 366, अ 376 आणि लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (POCSO Act) कलम 4, 8 च्या गुन्ह्यातून फौजदारी प्रकियेच्या संहिता कलम 235 (1) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.