पुणे : वाढत्या महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. मेट्रो शहरांमध्ये चिकन, मटन, मासे आणि अंडी इत्यांदीचे दर वाढल्याचे दिसून आले होते. आज पुण्यात दुधाच्या खरेदी ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील सर्व दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची काल बैठक पार पडली. बैठकीत दुधाच्या खरेदीमध्ये 3 रुपयांनी तर विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या बैठकीत महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


दूध पावडर व बटर यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादन म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे दूध व्यवसायिकांचे म्हणणे आहे.


इंधन दरात आणि पशू खाद्य या मध्ये झालेली वाढ या मुळे ही वाढ करण्यात आली आहे अशी माहिती कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली.