Pune Crime news :  दारुच्या नशेत चोरी करायचा पण दारु उतरली की एकदम नॉर्मल वागायचा. पुण्यात एका अजब चोराची गजब कहानी समोर आली आहे.  पुणे शहरात घडत असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत जर माहिती घेतली तर वेगवेगळ्या शकली लावून चोरी करतानाचे अनेक प्रकरणे आपण पाहिलं आहे.अशीच काहीशी घटना पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे (Pune Crime news). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी अटक केलेला हा चोर दारूच्या नशेत वाहने चोरायचा आणि दारू उतरली की चोरीचे वाहन तो तिथेच सोडून द्यायचा. अशा या चोराला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.  आसिफ अकबर शेख  (वय 30 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  आरोपीवर आठ गुन्ह्यांची नोंद आहे. 


चोराचा कारमाना पाहून पोलिस थक्क


लष्कर पोलीस ठाण्यात शसुरज बोराटे यांनी तक्रार दाखल केली होती.  याबाबतीत पोलिसांनी माहिती दिली की दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज मधील व रेकॉर्ड वरील गुन्हेगार कोंढवा पोलीस स्टेशन च्या हद्दीत आढळला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.


अटक आरोपी हा दारुच्या नशेत मोटार सायकल वाहने चोरी करुन ती पेट्रोल संपेपर्यंत वापरत असे. पेट्रोल संपल्यानंतर तो ते वाहन तेथेच सोडुन देत होता व तेथुन दुसरी मोटार सायकल चोरुन नेत होता. असे त्यांनी यापुर्वी मार्केटयार्ड पोलीस स्टेशन खडक पो स्टें,भारती विदयापीठ पोलीस, लष्कर पो स्टे येथे वाहन चोरीचे गुन्हयात अटक करण्यात आली आहे.


नीट परीक्षेत बसलेल्या दोन नकली परीक्षार्थींना अटक


यवतमाळ मध्ये नीट च्या परीक्षेत दोन बनावट विद्यार्थ्यांनी पेपर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी तक्रारीनंतर दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य दोन आरोपी पसार झाले आहे. जितेंद्र रामगोपाल गाट व महावीर शिखरचंद आघाडीवाड असे अटकेतील आरोपींची नावं आहेत, त्यांच्याकडे बनावट प्रवेश कार्ड आणि बनावट आधार कार्ड आढळून आले. डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी नीट ची परीक्षा देतात. त्यामुळे या प्रकरणात काही रॅकेट सक्रिय आहे का याचा तपास पोलीस करीत आहे.