Friendship Day 2022 -                                                            मैत्री करत असाल तर
                                                                                               पाण्या सारखी निर्मळ करा.
                                                                                                   दूर वर जाऊन सुद्धा
                                                                                              क्षणों क्षणी आठवेल अशी करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैत्री हे असं नातं आहे जे ठरवून होतं नाही. बस्स सहवासाने मैत्री फुलतं जाते. रक्ताच्या नात्यापेक्षा असं हे मैत्रीचं घट्ट नातं असतं. मैत्रीत स्त्री-पुरुष असा कुठलाही भेद नसतो. मैत्री ही कोणामध्येही आणि कुठल्याही वयात होऊ शकते. पण तुमची मैत्री कधी प्रेमात बदलते हे अनेक वेळा तुम्हालाही ठाऊक नसतं. येत्या रविवारी Friendship Day आहे. मग तुमचं मैत्रीचं नातं प्रेमात बदलं का? हे जाणून घेऊयात. कारण मैत्री असो वा प्रेम या दोन्ही नात्यात शेअरिंग (Sharing) आणि केअरिंग (Caring) मुळे नातं अधिक फुलतं जातं. अशातून हे कळणं जरा कठीण आहे की तुमच्यामध्ये मैत्री आहे की प्रेम? आज आपण हीच गोष्ट जाणून घेणार आहोत.  (friendship or love signs show friendship converted love trending news in marathi)


'त्या' व्यक्तीचा चेहरा आणि विचार सतत येणे


जर सतत विचारात किंवा मनात एकच व्यक्तीचा विचार येत असेल तर तुम्ही मैत्रीत एक पाऊल पुढे गेले आहात. जर तुम्ही एकटे आहात आणि त्यावेळात जर तुम्हाला त्या व्यक्तीसोबतचा गोष्टी आठवतात म्हणजे तुम्हाला प्रेम झालं आहे. 



मत्सर जाणवणे


जर तुमला त्या व्यक्तीला दुसऱ्यांसोबत पाहिल्यावर मत्सर किंवा हेवा वाटत असेल तर तुमच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आहे. 


प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणे


जर तुम्हाला त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्टी लक्षात राहत असेल. रोजच्या दिवसातील छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एकमेकांना सांगत असाल. त्या व्यक्तीशी बोसल्याशिवाय दिवसभरातील गोष्टी न सांगल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय तुम्हाला झोप येत नसेल तर तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे.


आकर्षण वाटेल


तुम्ही प्रेमात आहात, तर तुम्हाला त्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटेल. कारण मैत्रीमध्ये टर्न ऑन ही भावना नसते. 


एकटं राहावसं वाटत नाही


जर प्रत्येक वेळी तुम्हाला त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो म्हणजे ये तो प्यार है. 


जर तुम्हाला मैत्रीत कोणाबद्दल अशा भावना वाटतं असेल तर, मैत्री तुटेल या भीतीने प्रेमाची भावना लपवू नका. त्या व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करा. 


हॅप्पी फ्रेंडशिप डे