Live-in Relation मध्ये असाल तर `या` 4 चुका करू नका!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी आणि तुमचं नातं कसं सांभाळावं हे जाणून घ्या
मुंबई : आजकाल अनेकांना लग्नाआधी एकत्र राहून एकमेकांना जाणून घ्यायचं आणि समजून घ्यायचं असतं. ज्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात. आजकाल भारतात त्याचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि कोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. पण अनेकदा असे घडते की लिव्ह-इन रिलेशनशिप दरम्यान पार्टनर्सकडून अशी चूक होते, ज्यामुळे ते त्यांच्या भविष्याचा विचार करू शकत नाहीत आणि लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांचं नातं तुटतं.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही कोणती खबरदारी घ्यावी आणि तुमचं नातं कसं सांभाळावं.
घरगुती खर्च वाटून घ्या
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सर्वात मोठा नियम हा आहे की तुम्ही संपूर्ण घर कोणत्याही एका जोडीदारावर खर्च करू नका. जर तुम्ही दोघं काम करत असाल तर तुम्ही घराचा खर्च अर्धा-अर्धा करा.
पर्सनल स्पेसमध्ये जाऊ करू नका
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल तरीही एकमेकांना स्पेस देणं खूप गरजेचं आहे, कारण 1 पॉइंटनंतर प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो. त्यामुळे जोडीदाराला वेळ द्या. विनाकारण त्यांच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका.
कामात मदत करा
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 2 लोकं एकत्र राहतात. अशा परिस्थितीत घरातील कामं, स्वयंपाक, कपडे धुणं, भांडी धुणं अशी अनेक कामे होतात. सर्व कामांचा भार एका जोडीदारावर न टाकता, घरातील कामं आपापसात वाटून घ्या. यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत वेळही मिळेल आणि कामही लवकर पूर्ण होईल.
जेवण एकत्र करा
अनेकवेळा असे घडते की पार्टनर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असले तरीही ते एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे त्यांना एकटे बसून दुपारचे किंवा रात्रीचं जेवण करावं लागतं. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवायचे असतील तर त्यांच्यासोबत जेवण बनवण्यास मदत करण्यासोबतच किमान एक जेवण एकत्र जेवा.