`या` राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!
Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
Most Romantic Zodiac Sign : काही लोकांचा ज्योतिष शास्त्रावर खूप जास्त विश्वास असतो. त्यांचे म्हणणं असते की यावरून आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभावही जाणून घेऊ शकतो. त्यातही आणखी काही गोष्टी आहेत त्यावरून एखादी स्त्री ही रोमॅन्टिक आहे की नाही हे शोधून काढू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला तिचा हाथ पाहायची गरज नाही किंवा तिची जन्म तारिख आणि जन्म वेळ जाणून घ्यायची गरज नाही... तर फक्त तुम्हाला तिची राशी माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला जी मुलगी आवडते तिला प्रपोज करण्यासाठी फक्त तिच्या राशीविषयी माहित असायला हवं. मुलीच्या राशीवरून जाणून घेऊ शकतात की ती मुलगी रोमॅन्टिक आहे की नाही.
डेली मिररनं दिलेल्या रिपोर्टनुसार, अॅशले मॅडिसन, विवाहित लोकांसाठी बनवलेल्या डेटिंग वेबसाइटनं त्यांच्या सर्वेक्षणात 21 हजार 400 हून अधिक वापरकर्त्यांचा समावेश केला आहे. त्यातून निघालेल्या निष्कर्षांनुसार मकर राशीच्या महिला या खूप रोमॅन्टिक असतात. 'आयुष्य लहान आहे, त्याचा आनंद घ्या!' मकर राशीच्या लोकांना रोमान्स जास्त आवडतो. त्यातही ज्यांचा जन्म 22 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान झाला आहे, ते खूप रोमॅन्टिक असतात.
ज्योतिषी Inbal Honigmann यांच्या माहितीनुसार, कर्क, मीन आणि वृश्चिक सारख्या राशी असलेल्या महिला खूप रोमॅन्टिक असतात. त्यांना कोणासोबतही संबंध ठेवायला आवडते. तर मेष, सिंह आणि धनु राशीच्या महिला या खूप भावनांमध्ये वाहून जातात. त्यांना त्यांच्या अंथरुणात कोणीतरी असणं गरजेचं आहे. या सगळ्यांच्या तुलनेत कुंभ, तूळ आणि मिथुन या राशी बौद्धिक असतात असं म्हटले जाते. त्यांना त्यांच्या पार्टनरशी बोलायला आणि चित्रपट पाहायला खूप आवडतं. ते तिथ पर्यंतच मर्यादित राहतात. ते इंटिमेट होत नाहीत.
जर तुम्ही मकर राशीच्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांना स्वत: साठी सर्वोत्तम जोडीदार हवा आहे. याचाच अर्थ सर्वात सुंदर, चांगलं फॅमिली बॅकग्राऊंड असलेलं.त्यामुळे तुम्ही मकर राशीच्या व्यक्तीला भेटत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी खास आहात असे त्यांना वाटू द्या. नाही तर त्यांना तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळाला तर ते दुसरीकडे जाऊ शकतात.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)