मुंबई : तुमच्या पार्टनरला स्पेशल फील करण्यासाठी सरप्राईज हा एक उत्तम मार्ग आहे. यावेळी ती व्यक्ती तुमच्यासाठी किती खास आहेत आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही किती उत्साही आहात हे दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. मुळात नात्यातील कंटाळा किंवा एखादं भांडण दूर ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
 
मात्र सरप्राईज प्लॅन करताना काही चुका टाळणं गरजेचं आहे. या चुका तुमच्या सरप्राईज प्लॅनची ​​सगळी मजा खराब करू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पार्टनरला सरप्राईज करताना कोणत्या चुका कधीही करू नयेत हे सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टनरला सरप्राईज देताना या चुका टाळा


स्वतःच्या आवडीला प्राधान्य देणं


जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर त्यांच्यावर कधीही तुमची निवड लादण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्या वस्तू द्या, ज्याची त्यांना गरज आहे किंवा ते पाहून जोडीदार आनंदी होतो.


महागडी गोष्ट गिफ्ट करणं


पार्टनरला सरप्राईज देण्याच्या नादात एवढी महागडी वस्तू घेऊ नका, हे पाहून जोडीदाराला पैशाची उधळपट्टी वाटू शकते. तुमच्या जोडीदाराला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्ट गिफ्ट करा.


नेहमी एकाच पद्धतीचं गिफ्ट


तुमच्या देत असलेलं गिफ्ट नेहमी एकाच पद्धतीचं असणार नाही याची विशेष काळजी घ्या. जर तुम्ही आधीच घड्याळ भेट म्हणून दिलं असेल तर यावेळी घड्याळाऐवजी दुसरे काहीतरी द्या.