Friendship 2022: प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खास मित्र असतो. असं म्हणतात की रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं खूप खास असतं. कारण ही मैत्री प्रेमळ आणि इतकीची निस्वार्थ असते. तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात अगदी तुमच्या सुख-दु:खात हा मित्र कायम तुमच्या सोबत उभा असतो. मित्र असो हवा जो आपण चुकल्यावर आपल्याला खरं-खोटं सांगणारा असावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैत्री कशी करायची याबद्दल कुठला असा अभ्यास नाही की शिक्षण नाही. मैत्रीला ना वयाची मर्यादा असते ना रंग, जात, धर्म, किंवा लिंग अडथळे बनतात. ती कधी पण कुठेही होते. पण आयुष्यात असे काही मित्र किंवा मैत्रिण असता जे आपला विश्वासघात करतात. आपल्या आयुष्यात खरा मित्र हा कठीण काळात आपल्याला कळतो. (trending news motivational thoughts on friendship remember these things protect your friendship tips)


मैत्री असावी अशी!


1. मैत्रीमध्ये, तुम्ही कोणाला किती दिवसांपासून ओळखत आहात हे महत्त्वाचं नसतं. तर तुमच्या आयुष्यात येऊन ती व्यक्ती पुन्हा जाणार नाही, हे महत्त्वाचं असतं. 


2. प्राण्याला कधी घाबरु नका, पण एका फसव्या मित्रापासून कायम सावध राहा. कारण प्राण्यापासून झालेली जखम बरी होती पण एका फसव्या मित्राने दिलेली जखमी अनेक वेळा आपलं प्राण घेऊन जातो. 


3. आयुष्यात तुमच्या शत्रूला मित्र बनण्याची हजार संधी द्या पण मित्राला कधीच शत्रू बनण्याची संधी देऊ नका.


4. खरा मित्र तो असतो जो तुमचा भूतकाळ समजून घेतो, तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसे स्विकारतो.


5. मैत्रीच्या नात्यांमध्ये कधी पैसा येऊ देऊ नका. पैशांमुळे रक्ताची नातीही तुटतात मग मैत्रीचं नातं जपताना या गोष्टीची काळजी घ्या.


6. कधीही मित्र-मैत्रिणींना इग्नोर करु नका. थोडा वेळ का होईना त्यांना वेळ द्या. 


7. अहंकारामुळे अनेक नात्यांमध्ये फूट पडते. त्यामुळे मैत्रीत शक्यतो अहंकार येऊ देऊ नका.