Kiss Day 2022: जाणून घ्या कोणत्या कीसचा नेमका काय अर्थ असतो?
किस डेच्या दिवशी जोडपं एकमेकांना किस करून प्रेम व्यक्त करतात.
मुंबई : व्हॅलेंटाईन वीकचा आजचा सर्वात खास आणि रोमँटिक दिवस आहे. आज Kiss Day आहे. किस डेच्या दिवशी जोडपं एकमेकांना किस करून प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहित आहे का की, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर कीस करण्याचा नेमका अर्थ काय असतो.
डोक्यावर कीस करणं
डोक्यावर कीस करणं हे तुमच्या पार्टनरविषयी एक वेगळं कनेक्शन दर्शवत. काही लोकं इमोशनल झाल्यावर पार्टनर डोक्यावर कीस करतात
हातावर कीस करणं
हातावर कीस करणं हे विश्वासाचं प्रतीक मानलं जाते. अनेकवेळा लोक आपली आवड व्यक्त करण्यासाठी जोडीदाराच्या हातावर कीस करतात.
ओठांवर कीस करणं
तुमचे प्रेम दाखवून देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही पार्टनरच्या ओठांवर कीस केलं तर ते तुम्हाला त्याच्या जवळ जाण्याच्या इच्छेबद्दल सांगतात.
कानावर कीस करणं
कानावर कीस करणं तुमची लैंगिक इच्छा दर्शवतं. अधिकतर लोकं इंटीमेट होण्यासाठी पार्टनरच्या कानावर कीस करतात.
गालावर कीस करणं
गालावर किस केल्याने तुमच्या पार्टनरबद्दल आपुलकी दिसून येते. गालावर कीस करणं देखील आकर्षण दर्शवते. अनेकदा असं दिसून आलंय की, जेव्हा लोक आपल्या जोडीदाराच्या प्रेमात पडतात तेव्हा ते त्यांच्या गालावर कीस करतात.
कॉलरबोनवर कीस करणं
जर तुम्ही जोडीदाराच्या कॉलरबोनवर कीस केलं तर त्यामुळे तुमची पार्टनरबद्दलची जवळीक दिसून येते. लोक सहसा प्राइवेट स्पेसमध्ये हे करणं पसंत करतात.
फ्लाइंग कीस करणं
फ्लाइंग कीस हे बहुतेकदा, लोक एकमेकांना सोडून जातात त्यावेळी केलं जातं. असं मानले जातं की, अशा जोडप्याचं फ्लाइंग कीसचं नातं खूप मजबूत मानलं जातं.