Relationship Tips: शारीरिक संबंध ही दोन भिन्न शरीरे एकत्र करण्याची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत, शारीरिक संबंध बनवताना, प्रत्येक व्यक्ती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते. आपल्या जोडीदाराला आरामदायक वाटावे अशी यामागची भावना असते. पण या प्रक्रियेदरम्यान अनेकवेळा काही चुका होतात. ज्यामुळे दोघांचा मूड ऑफ होऊ शकतो. त्यामुळे शारीरिक संबंध प्रस्थापित करताना काही महत्वाच्या गोष्टी टाळायला हव्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक संबंधादरम्यान जोडीदाराशी बोलणे महत्त्वाचे असते. पण असे अनेक विषय आहेत जे त्यावेळी बोलण्यास योग्य किंवा अनुकूल नसतात. यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. शारीरिक संबंधादरम्यान कोणते विषय टाळावेत याबद्दल माहिती करुन घेऊया.


गंभीर गोष्टींची चर्चा करण्याची ही वेळ नाही


आर्थिक समस्या, कौटुंबिक कलह किंवा कामाचा ताण यासारख्या गंभीर किंवा जड वाटणाऱ्या विषयांवर चर्चा करण्याची ही सर्वोत्तम वेळ नसते. या चर्चा तुम्हाला विचलित करू शकतात आणि त्या क्षणाच्या शारीरिक संबंधापासून दूर जाऊ शकतात. 


टीका किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देऊ नका


संभोग करताना जोडीदाराशी बोलणे महत्त्वाचे आहे.  तुम्ही कशाचा आनंद घेत आहात आणि तुम्हाला काय वेगळे प्रयत्न करायचे आहेत? अशा गोष्टींची तुम्ही चर्चा करु शकतात. अशावेळी टीका करणे किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देणे अयोग्य ठरेल. असे केल्यास ते आपल्या जोडीदाराच्या आत्मसन्मानासाठी हानिकारक असू शकते.


मागील संबंध किंवा लैंगिक अनुभव सांगत राहू नका


पूर्वीचे नातेसंबंध किंवा लैंगिक अनुभव समोर आणल्याने तुमच्या जोडीदाराला अस्वस्थता किंवा असुरक्षित वाटू शकते. तुमच्या जोडीदारासोबतच्या तुमच्या सध्याच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या जोडीदाराची इतरांसोबत तुलना करू नका.


भविष्यातील योजना किंवा जबाबदाऱ्यांची चर्चा नको


भविष्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परंतु शारीरिक संबंधादरम्यान भविष्यातील योजना किंवा जबाबदाऱ्यांवर चर्चा करणे हे तुमच्या पार्टनरला विचलित करु शकते. यामुळे तुम्ही वर्तमान क्षणापासून दूर जाऊ शकते.