मुंबई : लग्न म्हणजे दोन जीवांचे बंधन असते. लग्नानंतर माझे तुझे असे काही नसते तर ते आपले असते असं म्हटलं जात. पण लग्न जरी झालं असलं तरी त्या दोन व्यक्ती या स्वतंत्र असतात. त्यांना त्यांचे खाजगी आयुष्यही असतेच की. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक नवरे लग्नानंतर आपल्या बायकोवर अधिकार गाजवायला बघतात. तिने कुठे जावे, काय करावे हे सगळं नवरा ठरवतो. मात्र नवऱ्याचे असे वागणे त्यांच्या नात्यात मात्र कटुता आणते. लग्नांतर कोणत्याही नवऱ्याने बायकोला खालील प्रश्न विचारु नयेत. 


बायकोला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारु नका. यामुळे नवरा आपल्यावर संशय घेतो की काय असे बायकोला वाटते. 


बायकोच्या आयुष्यातही खाजगी गोष्टी असतात. त्यांचा आदर करा. 


सतत तु कोणाशी फोनवर बोलत असतेस, सतत फोन का हातात असतो असे प्रश्न विचारु नका. 


बायको कमवत असेल तर पैसे खर्च करण्याचा अधिकार तिलाही आहे हे लक्षात ठेवा. 


लग्नाआधी बायकोला तिचे बॉयफ्रेंड होते का? अथवा त्यांच्याबद्दल माहिती विचारु नका.