Shanidev Impact: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या गोचराला विशेष महत्त्व आहे. शनिदेवांच्या आगमनामुळे अनेकांना कठोर काळातून जावं लागतं. कारण सूर्यपुत्र शनिदेव यांना न्यायदेवता संबोधलं जातं. शनिदेव व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळं देतात. पण शनिदेवांचा वार असलेल्या शनिवारी काही काही खास गोष्टी दिसल्या की, तुमच्यावर कृपा होते, असं बोललं जातं.


  1. COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कावळा: शनिवारी घराच्या बाहेर कावळा पाणी पिताना दिसला की, शुभ मानलं जातं. लवकरच तुम्हाला शुभ बातमी मिळणार असल्याचे संकेत असतात. या दिवशी कावळा घराच्या छतावर बसल्यास शुभ संकेत असतात.

  2. काळा कुत्रा: शनिवारी सकाळी काळा कुत्रा दिसल्यास शुभ मानलं जातं. जर शनिवारी शनि मंदिराजवळ काळा कुत्रा दिसल्यास त्याला भाकरीचा तुकडा अवश्य द्या. यामुळे शनिदेवांची कृपा मिळते.

  3. घोड्याची नाल: शनिवारी रस्त्यात घोड्याची नाल मिळाली, तर ती घरी आणून दरवाज्यावर लावून घ्या. यामुळे अडचणी कमी होतात. तसेच घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.

  4. निर्धन व्यक्ती: शनिवारी कुणी निर्धन व्यक्ती आपल्या दारात आला तर हा एक शुभ संकेत आहे, असं समजा. अशा लोकांना काहीतरी द्या. त्यामुळे शनिदेवांची आपल्या कृपा राहील.

  5. झाडू मारणारा व्यक्ती: शनिवारी झाडू मारणारा व्यक्ती किंवा कर्मचारी दिसल्यास शुभ मानलं जातं. असा व्यक्तीला जरूर काहीतरी दान करा. यामुळे आर्थिक अडचण दूर होते.

  6. काळी गाय: शनिवारी रस्त्यात काळ्या गायीचं दर्शन झाल्यास तर अडकलेली कामं मार्गी लागतील असं समजा. शनिवारी काळी गायीचं दर्शन होणं शुभ मानलं जातं.

  7. पिंपळाचं झाड: शनिवारी घराबाहेर पडताना रस्त्यातील पिंपळाच्या झाडाकडे लक्ष गेल्यास तो दिवस चांगला जातो. आपल्या कामात यश मिळण्याची दाट शक्यता असते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)