Surya And Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. या ग्रहांच्या संक्रमणामुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतात. या ग्रह गोचरच्या मानवी जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. मार्च महिन्याला सुरुवात झाली असून या महिन्यात एक घातक योग निर्माण होणार आहे. 14 मार्चला मीन राशीत राहू आणि सूर्याचा युतीमुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे. 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये हा योग घडून येत आहे. अशा स्थितीत या अशुभ योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. मात्र 3 राशीच्या लोकांना या घातक योगाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. या लोकांना आर्थिक हानीसोबत आरोग्याची समस्या उद्धभवणार आहे. (After 18 years Sun Rahu dangerous Grahan Dosh These zodiac sign people will suffer bad health effects along with loss of wealth)


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि राहूचा संयोग प्रतिकूल होऊ शकतो. कारण हा संयोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या बाहेर निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काही अनावश्यक खर्चांचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला खोट्या आरोपांचाही सामना करावा लागणार आहे. यामुळे तुम्ही सावधगिरीने राहा. तुमच्या सातव्या घराचा स्वामी सूर्यदेव असल्यामुळे विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येणार आहेत. तसंच यावेळी विचारपूर्वक भागीदारी व्यवसाय करताना लक्ष द्या अन्यथा नुकसान होईल. 


सिंह रास (Leo Zodiac) 


राहू आणि सूर्याच्या संयोगामुळे निर्माण झालेला ग्रहण योग सिंह राशीच्या लोकांसाठी अशुभ सिद्ध होणार आहे. कारण हा संयोग आठव्या घरात निर्माण होणार आहे. या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावा लागणार आहे. या काळात तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. तसंच, यावेळी कोणतेही मोठे नवीन व्यावसायिक व्यवहार किंवा करार करु नका. तसंच नवीन काम सुरू करु नका. यावेळी, तुमचे तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होणार आहेत. त्यामुळे सतत वाद घालू नका. 


तूळ रास (Libra Zodiac)  


सूर्य आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. कारण हा संयोग तुमच्या संक्रमण कुंडलीतून सहाव्या भावात निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सहाव घर रोग, शत्रू, भय, बाधा आणि कोर्टाचे स्थान आहे. त्यामुळे या दिवसांत तुम्हाला शत्रूंपासून सावध राहा. तसंच, तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागणार आहे. त्याच वेळी, गुप्त शत्रू वर्चस्व गाजवणार आहेत. तसंच हृदयरोग्यांनी या काळात विशेष काळजी घ्या. 


हे विशेष उपाय करा!


कुंभ, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांनी या दिवसांमध्ये सूर्यदेवाची पूजा करा. तुम्ही रुबी रत्नदेखील धारण करु शकता. दानधर्म करा. भैरो मंदिरात दिवा लावा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)