Shash And Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचरमुळे अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होतात. या राजयोगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. डिसेंबरमध्ये 3 राजयोग तयार झाले असून मंगळ आणि शनिदेव यांनी हे राजयोग निर्माण केला आहे. ज्यामध्ये मंगळाने एक रूचक राजयोग तयार केला आहे. शनिदेवाने शश राजयोग निर्माण केला आहे, तर शुक्राने मालव्य राजयोग निर्माण केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. जाणून घेऊया तिन्ही राजयोगांमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.


वृषभ रास (Taurus Zodiac)


शश आणि रुचक राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. प्रलंबित रक्कम प्राप्त झाली आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकणार आहे. नोकरी करणार्‍यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे नवीन नोकरीसाठी फोन येऊ शकतो. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


शश आणि रुचक राजयोगाच्या निर्मितीने तुमच्यासाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. व्याज, बँकिंग, हॉटेल लाइन, केमिकल, ऑइल वाहनांशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी भरपूर नफा मिळू शकतो. तुमची प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना अपेक्षित पदोन्नती किंवा पगारात वाढ होऊ शकते.


कुंभ रास (Kumbh Zodiac)


हे 3 राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकणार आहेत. तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. नोकरदारांना प्रमोशन मिळू शक्यता आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )