Budh Gochar 2023 : 8 जुलैपासून `या` राशींवर पडणार पैशांचा पाऊस; बुध करणार कर्क राशीत प्रवेश
Budh Gochar 2023 : जुलै महिन्याच्या 8 तारखेला बुधाचं गोचर होणार आहे. बुध ग्रह बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक आहे. कर्क राशीत बुधाचा प्रवेश 3 राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असणार आहे.
Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. बुध ग्रह बुद्धिमत्ता आणि तर्कशक्तीचा कारक आहे. ज्यावेळी बुध ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो तेव्हा सर्व 12 राशींच्या जीवनावर याचा परिणाम होताना दिसतो.
जुलै महिन्याच्या 8 तारखेला बुधाचं गोचर होणार आहे. राशीत बदल केल्यानंतर बुध कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान कर्क राशीत बुधाचा प्रवेश 3 राशीच्या लोकांसाठी खूप सकारात्मक असणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा शुभ परिणाम मिळणार आहे.
सिंह रास
सिंह राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाच्या गोचरचा सकारात्मक फायदा होणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होणार आहे. व्यवसाय किंवा इतर कोणत्या ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते पैसे मिळू शकणार आहेत. ताणतणाव आणि समस्या दूर होणार आहेत. कुटुंबातील व्यक्तींकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
कन्या रास
बुध ग्रहाच्या गोचर चांगला आणि शुभ फायदा कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. या काळात व्यवसायाचा विस्तार होणार आहे. चांगली कामगिरी केल्याबद्दल तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तसंच तुमचं उत्पन्न वाढणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांचा शोध संपेल. काही लोकांना धन आणि सन्मान मिळू शकणार आहे.
वृश्चिक रास
बुधाचं गोचर वृश्चिक राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे. हा काळ तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे. तुम्हाला मोठी बढती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाच्या विचारात असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे. व्यवसायात नफा वाढणार आहे. जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होतील. योग्य पद्धतीने काम केल्यास तुम्हाला मोठे फायदे होणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )