Mars Transit In Capricorn: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रहांचं भ्रमण होणार आहे. यापैकी एक ग्रहांचा सेनापती आणि भूमीपुत्र मंगळ देखील आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9.07 वाजता तो मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ शनीच्या राशीत प्रवेश केल्याने अनेक राशींना फायदा होणार आहे. यावेळी अनेक राशींनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मंगळाच्या गोचरमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ देखील होणार आहे. मंगळाचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं. मकर राशीत प्रवेश करून लोक प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना मंगळाच्या गोचरचा फायदा होणार आहे. 


मेष रास (Mesh Zodiac)


मंगळाच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात प्रसिद्धी मिळू शकणार आहे. प्रोफेशनल लाईफ खूप चांगली जाणार आहे. तुमच्या करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता संपू शकतात. यशाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही नेतृत्व करताना दिसतील. वैयक्तिक आयुष्य देखील चांगलं राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याची योजना देखील बनवू शकता. आर्थिक परिस्थिती मजबूत असणार आहे. 


तूळ रास (Tula Zodiac)


या राशीच्या चौथ्या भावात मंगळाचे भ्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांचे व्यावसायिक जीवन चांगले राहणार आहे. परिश्रम आणि समर्पणाचे फायदे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. तुम्हाला प्रगतीसोबत प्रमोशन मिळू शकतं. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मोठ्या करारावर स्वाक्षरी करून भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसाय करणाऱ्यांनाही सुवर्णसंधी मिळू शकते. 


वृश्चिक रास (Vrishchik Zodiac)


मंगळाच्या गोचरमुळे नोकरी-व्यवसायात प्रगतीसोबतच भरपूर आर्थिक लाभही मिळणार आहेत. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकणार आहे. कामाच्या संदर्भात तुम्हाला छोट्या सहली कराव्या लागतील. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतील. यामुळे संपत्तीत वाढ होईल. यासोबतच नोकरीच्या नवीन संधीही उपलब्ध होऊ शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )