Kuldeepak Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलतात. या ग्रहांच्या संक्रमणातून कधी शुभ तर कधी अशुभ योग निर्माण होतात. या शुभ आणि अशुभ योगाचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीवर होतो, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांचं मत आहे. या शास्त्रानुसार देवतांचा गुरु बृगस्पति हा ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. या महिन्यातील 31 डिसेंबरला गुरु ग्रह मार्गी लागणार आहे. गुरुच्या या स्थिती बदलामुळे तब्बल 500 वर्षांनंतर मेष राशीत दुर्मिळ असा कुलदीपक राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे नवीन वर्षात काही राशींचं भाग्य चमकणार आहे. अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य त्यांना प्राप्त होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या. (After 500 years in Kundali Kuldeepak Rajyoga In 2024 these zodiac signs will get money prestige)


'या' राशी होणार श्रीमंत 


मेष रास (Aries Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलदीप राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीत फक्त गुरुदेव भ्रमण करत असल्याने यांना फायदा होणार आहे. येणारं नवीन वर्ष 2024 हे या राशींच्या लोकांसाठी नशिबाची चावी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक आणि शुभ परिणाम दिसून येणार आहेत. व्यावसायिकांसाठी हा राजयोग लाभदायक ठरणार असून त्यांना मोठा नफा मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होणार आहे. या राशीच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी गुरु असल्याने नवीन वर्ष यांच्यासाठी भाग्यवान सिद्ध होणार आहे. देश विदेशात प्रवासाचे योग तुमच्या नशिबात आहेत. 


कर्क रास (Cancer Zodiac)   


कर्क राशीच्या कर्म घरामध्ये गुरु देव भ्रमण करत आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना कुलदीपक राजयोग फायदेशीर ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात ते उंच शिखर गाठणार आहेत. पैशांचा ओघ चहूबाजूने असणार आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे. जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. लव्ह लाइफमध्ये रोमान्स वाढणार आहे. 


सिंह रास (Leo Zodiac) 


सिंह राशीचा स्वामी सूर्याचा गुरु ग्रह मित्र आहे. त्यात तुमच्या राशीतून गुरु ग्रह नवव्या घरातून जात असल्याने तुम्हाला नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी कुलदीपक राजयोग प्रगती आणि यश घेऊन आलं आहे. तुमच्यावरील कर्जाचं ओझ उतरणार आहे. जीवनातील सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमच्या राशीच्या पाचव्या आणि आठव्या घरातचा स्वामी गुरु असल्याने तो तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे. तुम्हाला मुलांकडून आंनदाची बातमी मिळणार आहे. अचानक तुम्हाला पैसे मिळणार आहेत.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)