Lakshmi Narayan Yog In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रामुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग देखील तयार होतात. शास्त्रामध्ये अनेक विशेष योगांचा उल्लेख आहे, त्यातील एक प्रमुख योग म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग. येत्या काळात हा राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींचं नशीब या राजयोगामुळे उजळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. एप्रिलमध्ये व्यापार देणारा बुध आणि धनाचा दाता शुक्र यांच्या संयोगामुळे हा राजयोग तयार होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. तुमच्या कुटुंबातील वाद मिटणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीतून पाचव्या भावात तयार होणार आहे. तुमच्या मुलाला नोकरी मिळू शकते किंवा लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असाल. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल.


धनु रास (Dhanu Zodiac)


धनु राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.  तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळेल. यावेळी तुमचे आईसोबतचे संबंध चांगले राहतील.


वृषभ रास (Taurus Zodiac)


धनु राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग शुभ ठरू शकतो. कारण तुमच्या राशीच्या चौथ्या घरात राजयोग तयार होणार आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. तुमचा आर्थिक फायदा प्रचंड होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )