Surya Grahan 2024 Date And Time : ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या ग्रहणाला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अतिशय अशुभ मानले जाते. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आहे. होळी या महिन्यातील 25 मार्चला असणार आहे. तर या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण होळीनंतर अवघ्या 15 दिवसांनी आहे. एप्रिल महिन्यात या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असून ते खग्रास सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण हे कोणत्या राशीसाठी सकारात्मक तर कोणत्या राशीसाठी नकारात्मक ठरणार आहे. त्याशिवाय सूर्यग्रहण एप्रिलमध्ये कधी आहे, जाणून घेऊयात. (After the lunar eclipse on Holi the first solar eclipse in april 2024 date time and The grace of Sun God will be on these zodiac signs)


कधी आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होळी पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला असणार आहे. पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या 8 एप्रिलला असणार आहे. हे सूर्यग्रहण 9 वाजून 12 मिनिटांपासून पहाटे 2 वाजून 22 मिनिटांपर्यंत असणार आहे. चंद्रग्रहणाप्रमाणेच या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही. तर हे सूर्यग्रहण पश्चिम युरोप पॅसिफिक, अटलांटिक, कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका, इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे. 


'या' राशींना होणार सूर्यग्रहणाचा फायदा!


मेष (Aries Zodiac)  


य़ा वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे. ही लोक शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी होणार आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. दीर्घकाळ ज्या आजारामुळे तुम्ही त्रस्त असणार आहात त्यांची त्यातून मुक्तता होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. आर्थिकदृष्ट्या हे ग्रहण शुभ असणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


वर्षातील पहिलं सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुमच्या करिअरसंदर्भात चांगली बातमी मिळणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्या दूर होणार असून घरात आनंदी वातावरण असणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला विशेष लाभ होणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2024 : तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण, 'या' राशींचा सुरु होणार सुवर्ण काळ


सिंह (Leo Zodiac) 


वर्षातील पहिलं सूर्यग्रह हे सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमचे आतापर्यंतचे रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मान सन्मान वाढणारा हा सूर्यग्रहणाचा योग ठरणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ शुभदायक ठरणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)    


वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ घेऊन आला आहे. या सूर्यग्रहणाच्या प्रभावाने तुमची आर्थिक बाजू मजबूत होणार आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची प्रगती तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करणार आहात. वैवाहिक जीवनासाठी देखील हा काळ शुभ असणार आहे. या काळाच तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदी असणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)