Saturn Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. त्यामुळे ग्रहांच्या या स्थितीचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. सूर्यग्रहणानंतर आणि दिवाळीपूर्वी शनिदेव दोन वेळा आपली चाल बदलणार आहे.  15 ऑक्टोबर शनिदेव नक्षत्र (Shani Nakshatra Parivartan) बदलणार आहे तर 4 नोव्हेंबरला शनिदेव कुंभ राशीत प्रतिगामी (Shani Margi 2023) होणार आहे. यामुळे 5 राशींची दिवाळी यंदा मालामाल असणार आहे. (After the sun transit 2023 Saturn Transit 2023 shani dev nakshatra Diwali 2023 will be rich for 5 zodiac signs)


मेष (Aries Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेवाच्या कृपेने या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. वाहन खरेदीचे योग आहेत. व्यवसायिकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. तुम्हाला वडिलांकडून खंबीर पाठिंबा मिळणार आहे. या दिवसांमध्ये तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफरदेखील मिळू शकतं. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला अनेक लाभ होणार आहे. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार असून धार्मिक कार्य ठरणार आहे. धनलाभाचे योग आहेत. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात तुम्हाला आनंद मिळणार आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. व्यवसायिकांना लाभ मिळणार आहे. उत्पन्न वाढवण्याचे साधन विकसित करता येईल. 


मिथुन (Gemini Zodiac)


या लोकांचा आत्मविश्वास परिपूर्ण होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला लाभ होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळणार आहे. मालमत्तेतून आर्थिक फायदा होणार आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. वाहन सुख लाभणार आहे. एखाद्या मित्राकडून धनलाभाचे योग आहेत. नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी वाढणार आहे. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 9 to 15 ऑक्टोबर 2023 : हा आठवड्यात 'या' लोकांच्या करिअरमध्ये अडथळे, बँक बॅलेन्स गडबडणार


कन्या (Virgo Zodiac) 


हा काळ तुमच्यासाठी प्रसन्न ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास द्विगुणीत होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक असणार आहे. नोकरीत बदल घडू शकतो. खर्चात कपात होणार असल्याने बँक बॅलेन्स वाढणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. प्रवासातूनही तुम्हाला लाभ होणार आहे. नोकरीत उत्तम संधी मिळणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac)


शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असणार आहे. यंदा दिवाळी तुमच्यासाठी सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. व्यावसायिकांसाठी चांगला काळ असणार आहे. वाहन खरेदीचा योग आहे. तुमच्या बँकेत अचानक पैसेच पैसे असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि यश तुमची वाट पाहत आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Surya Gochar 2023 : 10 दिवसांनी महागोचर! सूर्यदेव 5 राशीच्या लोकांना देणार पैसाच पैसा



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)