Horoscope Money Weekly : 9 to 15 ऑक्टोबर 2023 : हा आठवड्यात 'या' लोकांच्या करिअरमध्ये अडथळे, बँक बॅलेन्स गडबडणार

Weekly Career Horoscope 9 to 15 october 2023 : ऑक्टोबरचा हा आठवडा काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे. तर काही लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 8, 2023, 03:15 PM IST
Horoscope Money Weekly : 9 to 15 ऑक्टोबर 2023 :  हा आठवड्यात 'या' लोकांच्या करिअरमध्ये अडथळे, बँक बॅलेन्स गडबडणार title=
weekly money career horoscope 9 october to 15 october 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy and pitru paksha and Surya Grahan 2023

Horoscope Money Weekly (9 october to 15 october 2023) : ऑक्टोबरच्या या आठवड्यात सूर्यग्रहण, सर्वपित्र अमावस्या, शनिश्चर अमावस्या आणि नवरात्री सण असणार आहे. यामुळे हा आठवडा काहींसाठी अडचणीचा तर काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. जाणून घ्या या आठवड्याचं आर्थिक राशीभविष्य...

मेष (Aries Zodiac) 

या राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. हातातील प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील आणि प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च वाढणार आहे. खर्चाकडे लक्ष द्या अन्यथा अडचणीत या.  प्रेमसंबंधांमध्ये, परस्पर प्रेम दृढ होणार असून रोमँटिक क्षण व्यतीत करणार आहात. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. या आठवड्यात प्रवासातून शुभ योग जुळून येणार आहे. 

शुभ दिवस: 11, 12, 14

वृषभ (Taurus Zodiac) 

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत प्रगतीची असणार आहे. या आठवड्यात प्रवासातून शुभ संयोग असणार असून त्यातून यश मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडी अस्वस्थता तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे मानसिक त्रास वाढणार आहे. यावेळी आर्थिक खर्चही जास्त असणार आहे. काही कौटुंबिक बाबींसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता तुम्हाला भासू शकते. सप्ताहाच्या शेवटी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. 

शुभ दिवस: 12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना हा आठवडा कामाच्या दृष्टीकोनातून उत्तम असणार आहे. यावेळी वेळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार असून त्यातून यश मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये, तुम्ही बॅकअप योजना तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी सकारात्मक वेळ घालवणार आहात. तुम्हाला प्रवासातही शुभ परिणाम दिसून येणार आहे. कुटुंबात काही कारणाने अनावश्यक तणाव वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचं मन काही बाबतीत अस्वस्थ असू शकतं. 

शुभ दिवस: 12,14

कर्क (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ सिद्ध होणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात. आर्थिक बाबतीत अचानक सुखद अनुभव तुम्हाला येणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी मध्यम यश प्राप्त होईल. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचेही शुभ परिणाम दिसून येणार आहे. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या वृद्ध व्यक्तीबद्दल तुमचं मन अस्वस्थ होणार आहे. 

शुभ दिवस: 11,13

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रकल्पाशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावेल. आर्थिक बाबतीत खर्चाची परिस्थिती बेताची असणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि शांती आणणार आहे. 

शुभ दिवस: 12,13

कन्या (Virgo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. पैशाशी संबंधित प्रवास देखील तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. तुम्हाला दोन आकर्षित निर्णय घ्यावे लागतील, त्यातून तुम्ही गोंधळू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमचं मन दुखवल्या जाणार आहे. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या आळशी असा हा आठवडा वाटणार आहे. कामात रस वाटणार नाही. आठवड्याच्या शेवटी जीवनात यश मिळेल. 

शुभ दिवस: 12,13

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या आठवड्यात मजबूत स्थिती येणार आहे. हा आठवडा आर्थिक बाबींसाठी शुभ असणार आहे. धनाच्या आगमनामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या सुंदर भविष्याची योजना करणार आहात. या आठवड्यात प्रवासामुळे तुमची स्थिती सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक नुकसान सहन करावा लागणार आहे. तुम्ही जितकं अधिक भविष्याभिमुख असाल तितके तुम्ही आनंदी राहाल. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहे. 

शुभ दिवस: 11,13

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंदाचा असणार आहे. कौटुंबिक सहवासात तुम्ही आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. प्रवासातून सुंदर योगायोग घडणार असून यश मिळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनावश्यक तणावाचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीतही हा आठवड्यात खर्चिक असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे. जीवनात आनंद आणि समृद्धीची शक्यता आहे. 

शुभ दिवस: 13,14

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी गोड आणि आंबट अनुभव घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाने यश मिळेल. आर्थिक बाबतीत अधिक खर्च होणार आहे. या आठवड्यात तुम्ही खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. कुटुंबात अहंकाराचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

शुभ दिवस: 13

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांना हा आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन आला आहे. भागीदारीत केलेले काम तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आर्थिक बाबतीतही हा आठवडा लाभदायी आहे. पैशांशी संबंधित प्रवास तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत, प्रवासाद्वारे शुभ परिणाम दिसून येणार आहे. भावनिक कारणांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येईल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. 

शुभ दिवस: 11,12

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. प्रकल्पही वेळेत पूर्ण होणार आहेत. तरीही मनात दुःखाची भावना कायम असणार आहे. आर्थिक बाबतीत तुमची निराशा वाढण्याची शक्यता आहे. पण आर्थिक लाभाचे योगही आहेत. सौम्य स्नायू दुखण्याची शक्यता आहे. 

शुभ दिवस: 12, 13

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यशस्वी ठरणार आहे. प्रवासातून शुभ परिणाम मिळणार आहे. कौटुंबिक प्रकरणांबाबत दिलेली आश्वासने या आठवड्यात पुढे ढकलणं तुमच्यासाठी हिताचं ठरेल . जर तुम्ही बॅकअप प्लॅन बनवून पुढे गेलात तर तुम्हाला फायद्याचं ठरेल. नोकरीच्या ठिकाणी मोठ्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. भावनिक कारणांमुळे आर्थिक खर्चही जास्त प्रमाणात होणार आहे. 

शुभ दिवस: 12,13

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)