Akshay Navami Muhurta and Puja : हिंदू शास्त्रांअनुसार अक्षय नवमीला विशेष महत्त्व ( Importance of Akshay Navami) आहे. अक्षय नवमीला काही भागांमध्ये आवळा नवमी असं देखील बोललं जातं. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षातील नवमीला आवळा नवमी ( Amla Navami ) साजरी केली जाते. या दिवशी  केली जाते. आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने घरामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. अशात यंदा 2 तारखेला अक्षय नवमी साजरी केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा दोन विशेष योग जुळून येतायत. म्हणूनच यंदाच्या अक्षय नवमीचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं आहे. जाणून घेऊयात कोणता मुहूर्त आहे शुभ आणि पूजेच्या योग्य विधीबाबत.  


आता जाणून अक्षय नवमीचं महत्त्व  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्मपुराणानुसार आवळ्याला विशेष महत्त्व ( Padma Puran and Akshay Navami ) आहे. आवळ्याला साक्षात विष्णूचं रूप मानलं जातं. आवळ्याच्या झाडाला वंदन करणे म्हणजे साक्षात गो-दानासामान फलप्राप्ती होते असं बोललं जातं. ऋग्वेदातील माहितीप्रमाणे याच दिवशी सतयुगाची ( Start of Satyuga) सुरुवात झाली होती.आवळा नवमीला श्रीकृष्णाने गोकुळ सोडून मथुरेकडे प्रस्थान ठेवलं होतं.  म्हणूनच या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.  


कोणता योग येतोय जुळून  


पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीची तिथी 1 नोव्हेंबर मंगळवारी रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी सुरु होते आणि 02 नोव्हेंबर रात्री 9 वाजून 11 मिनिटांपर्यंत असणार आहे. म्हणूनच तिथीनुसार आवळा नवमी किंवा अक्षय नवमी ही बुधवारी साजरी केली वाजणार आहे. अक्षय नवमीच्या पूजेचा मुहूर्त 06 वाजून 33 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 05 मिनिटांपर्यंत असणार आहे. जमत असेल तर याच दिवशी आवळ्याच्या झाडाखाली गरिबांना जेवण द्या आणि किंवा दान द्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)