Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयेला अत्यंत शुभ योग जुळून आला आहे.  अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. यादिवशी केलेल्या शुभ कार्य सुफल होतं. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या अक्षय्य तृतीयेला 500 वर्षांनी पंचग्रह राजयोग जुळून आला आहे.  ज्योतिषशास्त्रात या योगाला केदार योग असंही म्हणतात. 


अत्यंत दुर्मिळ योग!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चार स्थानात 6 ते 7 ग्रह एकत्र येतात तेव्हा केदार राजयोग जुळून येतो. अक्षय्य तृतीयेला कुंभ राशीत शनी, मीन राशीत गुरु, गुरु गोचर आणि गुरु मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या वेळी चंद्र वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे यावेळी कुंभ, मीन, मेष आणि वृषभ या ग्रहांचा मेळा दिसून येणार आहे. खरं तर मेष राशीत पंचग्रह योग जुळून आला आहे. अक्षय्य तृतीयेला मेष राशीत गुरु, सूर्य, बुध, राहु आणि युरेनस एकत्र येणार आहे.  या केदार राजयोगामुळे काही राशींच्या नशिबात प्रेमासोबतच अपार धनसंपत्ती मिळणार आहे. कोणत्या राशीला होणार फायदा जाणून घेऊयात


मेष  (Aries)


पंचग्रह योगामुळे या राशीच्या लोकांना प्रचंड आर्थिक फायदा होणार आहे. चोहू बाजूने पैसे मिळणार आहेत. समाजाता मान-सन्मान वाढणार आहे. आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. मानसिक शांततेसाठी याकाळात गरजूंना मदत करायला विसरून नका. 


वृषभ  (Taurus)


या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. मालमत्तेमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता. आर्थिक लाभासोबत दागिन्यांचा लाभ होणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. 


कर्क (Cancer)


या राशींच्या लोकांसाठी पंचग्रह राजयोग सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. आर्थिक लाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. चांदी आणि हिराच्या खरेदी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही राजेशाही थाट अनुभवणार आहेत. 


सिंह (Leo)


या राशीच्या लोकांना हा योग खूप लाभदायक ठरणार आहे. तुमची अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. याची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात तुमचं कौतुक होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांना पंचग्रह योग आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरणार आहे. वाहन खरेदी करु शकता. घर आणि जमिनीत गुंतवणूक करा, ती भविष्यात फलदायी होणार आहे. घरात आणि कार्य क्षेत्रात मान सन्मान वाढणार आहे. 


धनु (Sagittarius)


या राशीसाठी केदार योग खूप शुभ असणार आहे. जमीन, घर आणि मालमत्ते केलेली गुंतवणूक शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रत्येक कामातून धनलाभाचा योग आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)