Akshaya Tritiya 2023 : यंदा 22 एप्रिल 2023 रोजी, शनिवारी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) सण साजरा केला जाणार आहे. असे मानले जाते की, या दिवशी तुम्ही दान केलातर तर ते शुभ मानले जाते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही केवळ अक्षय्य तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. साडेतीन मुहूर्तपैकी एक असलेल्या अक्षया तृतीया दिवशी केलेले शुभ कार्य चांगले असते. म्हणूनच या दिवशी लोक सोने-चांदी, घर-गाडी इत्यादी वस्तू खरेदी करत असतात. तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर कोणत्या मुहूर्त काढण्याची गरज लागत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच शास्त्रानुसार असे मानले जाते की, अक्षय तृतीय (Akshaya Tritiya 2023) सणाच्या आधी किंवा नंतर अशा गोष्टी घडतात, ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते. एखाद्या विशेष दिवशी पूजा केल्याने केवळ आर्थिक लाभच मिळत नाही, तर जीवनात येणारे संकटही दूर होतात. पण, अशी काही कामे आहेत ज्यामुळे लक्ष्मी रागावते. तुम्ही जर काही गोष्टी आवर्जुन केला तर नक्कीच तुम्हाला आर्थिक लाभ होईल...


जसे की, घरात आणलेल्या तुळशीच्या रोपाला धार्मिक महत्त्व आहे. तुमची तिजोरी सदैव भरलेली असते आणि काही आर्थिक अडचण असेल तर नवीन मिळवण्याची तुमची इच्छा असते आणि सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही तुळशीची पूजा करुन देवीला प्रार्थना करु शकता. तसेच घर जितके स्वच्छ असेल तितकी लक्ष्मीचा तिथे वास करते. विशेषत: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वच्छता करावी. वास्तूनुसार याचे अनेक फायदे आहेत. जिथे स्वच्छता असते तिथे नकारात्मकता नसते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर झाडूने कचरा काढू नये. सूर्यास्तानंतर लक्ष्मी झुंबरांच्या साहाय्याने घराबाहेर पडते. त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या घरात स्त्रियांचा आदर होत नाही, तिथे देव राहत नाही. याशिवाय ज्या घरात रोज भांडणे होतात त्या घरात देव राहत नाही. अशा लोकांना नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. इतरांचे वाईट करणे, वाईट बोलणे, वाईट विचार करणे यामुळेही माणसाचे पतन होते. अशा लोकनवर देवता कधीही प्रसन्न होत नाहीत आणि त्यांचा आशीर्वादही देत ​​नाहीत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, इतरंशी नेमी चागले वागा. 


अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त 


शनिवार, २२ एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा नियमानुसार करा. असे केल्याने अपार संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.


पुजा कशी करावी


अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे व नंतर पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर गंगाजलाने स्थान अभिषेक करून ईशान्य दिशेला एक पाठ ठेवा. त्यावर पिवळ्या रंगाचे कापड पसरवा आणि नंतर भगवान विष्णू-माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. चांदीच्या भांड्यात गंगाजल घेऊन त्यात केशर टाकून चंदन तयार करा. त्यानंतर हे केशर चंदन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला लावा आणि नंतर उरलेले चंदन कपाळावर लावा. यानंतरही जर चंदन उरले असेल तर ते ठेवा आणि जेव्हाही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल तेव्हा चंदन घेऊन जा.