Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला 100 वर्षांनंतर बनतोय दुर्मिळ संयोग; `या` राशींसाठी असणार सुवर्णकाळ
Akshaya Tritiya 10 May 2024: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास त्याचे परिणाम शुभ मिळतात. तसंच काही राशींसाठी अक्षय्य तृतीयेपासून सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. या लोकांना देवी-देवतांच्या कृपेने भरपूर संपत्ती मिळणार आहे.
Akshaya Tritiya 10 May 2024: प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी कोणतंही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येतं. यावेळी अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग आणि शश योग जुळून येणार आहे. असा अद्भुत योगायोग 100 वर्षांनंतर अक्षय्य तृतीयेला घडणार आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास त्याचे परिणाम शुभ मिळतात. तसंच काही राशींसाठी अक्षय्य तृतीयेपासून सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. या लोकांना देवी-देवतांच्या कृपेने भरपूर संपत्ती मिळणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हे दोन्ही राजयोग शुभ असणार आहेत.
या राशींसाठी शुभ असेल अक्षय तृतीया 2024
मेष रास
अक्षय्य तृतीयेला दोन शुभ योग तयार होणे मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. पदोन्नतीचे मार्ग खुले होतील. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास तुम्ही आनंदी होणार आहात. व्यवसायाचा विस्तार करणं फायदेशीर ठरू शकते. नवीन घर घेण्याच्या योजना यशस्वी होऊ शकणार आहेत.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात अक्षय्य तृतीया शुभ राहणार आहे. 10 तारखेपासून लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस सुरू होऊ शकतात. व्यवसायातही कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होईल. तुम्हाला उच्च स्थान आणि एक अद्भुत जीवन मिळेल. नोकरी करणाऱ्यांची चांगली प्रगती होईल. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया खूप शुभ आहे. पगारात वाढ होईल. यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. एकूणच परिस्थिती प्रत्येक बाबतीत चांगली राहील. पैशाशी संबंधित समस्याही संपुष्टात येतील. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )