Akshaya Tritiya 2024 : हिंदू धर्मानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेला साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्यातील शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. यादिवशी केलेल्या शुभ कामाला अक्षय्य प्राप्त होतो. यादिवशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग असणार आहे. (Akshaya Tritiya these people will be graced by Lord Shani positive effect on zodiac signs shash rajyog after almost 100 years)
त्यासोबतच परशुराम जयंतीदेखील आहे. अक्षय्य तृतीयेला तब्बल 100 वर्षांनी कुंभ राशीत शनिदेवाचा शश राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली आहे जाणून घ्या. 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय्य तृतीयाला शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या मान सन्मानातही वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात बढतीची शक्यता आहे. व्यापारी वर्गालाही त्यांच्या कामात फायदा होणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac) 


अक्षय्य तृतीयेला शनिदेवामुळे निर्माण होणारा शश राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली असणार आहे. या लोकांना गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यांना पदोन्नती मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Horoscope: बस काही दिवस! बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग 'या' लोकांना देणार अपार धन, प्रतिष्ठा-पद?


सिंह (Leo Zodiac) 


अक्षय्य तृतीयेला सिंह राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. तुम्ही जितका कमी खर्च करणार आहात तितका जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उंची गाठणार आहात. प्रगतीचे नवं मार्ग खुले होणार आहेत. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


अक्षय्य तृतीयेला या राशींवर शनिदेवाच्या शश राजयोगामुळे विशेष कृपा राहणार आहे. या लोकांची साडेसाडी सुरु असल्याने अक्षय्य तृतीयेपासून त्याचा प्रभाव कमी होणार आहे. नवीन काम सुरु करण्याचा विचारात असाल तर त्यासाठी हा शुभ काळ असणार आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी कानावर पडणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)