Amalaki Ekadashi 2023 : कधी आहे आमलकी एकादशी? राशीनुसार करा `हे` उपाय आणि धनवान व्हा!
Amalaki Ekadashi 2023 Upay : होळीच्या आधी येणारी आमलकी एकादशीला आवळ्याची पूजा केली जाते. असं म्हणतात आवळा वृक्षात देवी देवतांचा वास असतो. या वृक्षाची पूजा केल्यास आपले पाप नष्ट होतात असं शास्त्रात सांगण्यात आले आहे. जर तुम्ही राशीनुसार या दिवशी उपाय केल्या तुम्हाला धनलाभ होणार.
Amalaki Ekadashi 2023 Upay : होळीच्या आधी रंगभरी एकादशी किंवा आमलकी एकादशी येते. या वर्षी फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी ही 3 मार्चला येणार आहे. या दिवशी आवळ्याचा झाडाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार आवळ्याचा वृक्षाची पूजा केल्यास आपले पाप नष्ट होतात, असं म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आमलकी एकादशीला राशीनुसार उपाय आणि पूजा केल्यास तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होते. (amalaki ekadashi 2023 March 3 puja muhurat vrat parana time upay according all zodiac get money sign in marathi news)
'हे' उपाय करा आणि धनवान व्हा!
मेष (Aries)
आमलकी एकादशीला एकाक्षी नारळ पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नारळ तिजोरीत ठेवा. या उपायामुळे तुमच्या तिजोरीत कायम पैसा राहिल.
वृषभ (Taurus)
या राशीच्या लोकांनी घरामध्ये आवळ्याचे झाड लावला. त्यामुळे पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडतील. त्याशिवाय प्रत्येक कार्यात यश मिळेल.
मिथुन (Gemini)
या राशीच्या लोकांनी आवळ्याचा झाडाला पाणी अर्पण करुन 7 वेळा प्रदक्षिणा मारावी. त्याशिवाय सुताला हळद लावून ते सूत झाला गुंडाळावे. या उपायामुळे आर्थिक प्रगतीचे मार्ग मिळेल.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांनी आवळ्याचा पाण्याने भगवान विष्णूंना अभिषेक करावा. 108 वेळा ऊं नमो भगवते वासुदेवाय नम: या मंत्राचा जप करावा. यामुळे वैवाहिक जीवनात सुख शांती राहते.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांनी श्रीहरी विष्णूला चंदनाचा टिळक लावून त्याला आवळा अर्पण करा. त्यानंतर स्वतः वैष्णव तिलक लावून आवळा खिशात ठेवा. यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. अचानक धनसंपदा मिळेल.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांनी आवळ्याची पेस्ट शरीराला लावावी त्यानंतर आवळ्याचं रस पाण्यात घालून स्नान करावे, असं केल्यामुळे गंभीर आजार दूर होती.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांनी 108 आवळ्याचे फळ दान करावे, यामुळे तुम्हाला धनलाभ होणार. प्रत्येक कामात फायदा मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांना शत्रूपासून त्रास असेल तुम्ही मानसिक तणावात असाल तर नृसिंहाय वीद्यहे,बज्र नखाय धि मही तान्नो नृसही प्रचोदयात. या मंत्राचा जप करावा.
धनु (Sagittarius)
या राशीच्या विद्यार्थ्यांनी भगवान हरीची 21 पिवळ्या फुलांनी पूजा करावी. या उपायामुळे तुम्हाला करिअरमध्ये उत्तम संधी मिळेल.
मकर (Capricorn)
असं मानलं गेलं आहे की, आमलकी एकादशीचा उपवास केल्यास एक हजार गाईंच्या फळाएवढे पुण्य प्राप्त होतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी या दिवशी उपवास ठेवावा आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. या उपायामुळे तुम्हाला कधीही पैशाची चणचण जाणवणार नाही.
कुंभ (Aquarius)
या राशीच्या लोकांनी केशरमिश्रित पाण्याने लक्ष्मीनारायणाला अभिषेक करावा. त्यानंतर विष्णु सहस्त्रनाम पाठ करावा. त्यामुळे तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळते.
मीन (Pisces)
या राशीच्या लोकांनी श्री हरीला 21 गुंठ्या हळद अर्पण करावी. त्यानंतर ही हळद एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ती घराच्या मुख्य दारावर बांधावी. या उपायामुळे वाईट शक्तीचा नाश होतो आणि घरात सुख समृद्धी नांदते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)