Rahu Mangal Yuti Angarak Yog 2022: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या गोचरामुळे मनुष्य आणि पृथ्वीवर परिणाम होत असतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. नऊ ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असतात. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी, तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदल करतो. या बदलामुळे अनेकदा एका पेक्षा अधिक ग्रह एका राशीत एकत्र येतात. यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. आता ग्रहांच्या राशी बदलामुळे असाच एक अशुभ योग तयार होत आहे. राहु ग्रह सध्या मेष राशीत असून 27 जूनला मंगळ मेष राशीत विराजमान होणार आहेत. यामुळे अंगारक योग तयार होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगारक योगाचा प्रभाव कर्क, वृश्चिक आणि धनु राशीवर दिसून येईल. या तिन्ही राशींवर अंगारक योगामुळे मंगळ ग्रहाची दृष्टी असेल. या तिन्ही राशींना 44 दिवसांपर्यंत काळजी घ्यावी लागेल. कारण मंगळ 10 ऑगस्टला वृषभ राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर अंगारक योग संपेल. ही युती 27 जूनपासून 10 ऑगस्टपर्यंत राहील. त्याचबरोबर 14 जुलैपर्यंत शनिची या दोन्ही ग्रहांवर दृष्टी असेल. तर 16 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत मंगळ आणि राहु भरणी नक्षत्रात असतील. 1 ऑगस्टला दोन्ही ग्रह 24 डीग्रीत असतील. 


अंगारक योगाचा प्रभाव


  • अंगारक योगामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे

  • या योगामुळे रक्तासंदर्भातील आजार वाढण्याची शक्यता आहे. तसेच हाय बीपी असलेल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

  • या काळात भूकंप येण्याची शक्यता असून याचा केंद्र दक्षिण पूर्व असण्याची शक्यता आहे.

  • आगीच्या मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे.

  • रशिया युक्रेन युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. युद्धात मोठी शस्त्रे वापरली जाण्याची शक्यता आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)