आषाढी एकादशीला घरच्या घरी `अशी` करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी
Ashadhi Ekadashi Puja At Home: आषाढी एकादशीला प्रत्येकाला पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी विठुरायाची पूजा कशी करायची जाणून घ्या.
Ashadhi Ekadashi Puja Samagri at Home: विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठालाची...! संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठुरायाचा भक्तीत तल्लीन झालाय. पंढरपूर वारकऱ्यांनी विठुमय झाल आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला तिथीला विशेष महत्त्व असतं. प्रत्येकाला पंढरपुरात जाऊ विठ्ठलाचे दर्शन शक्य नसतं. अशावेळी आपल्या शहरातील विठ्ठल मंदिरात जाऊन भक्त दर्शन घेतात. पण आषाढी एकादशीला माऊलीची कृपा घरावर कायम राहावी म्हणून घरच्या घरी पूजा कशी करायची जाणून घ्या. (Ashadhi Ekadashi 2024 How to worship Ashadhi Ekadashi at home shubh muhurat puja vidhi in marathi)
आषाढी एकादशी तिथी (Devshayani Ekadashi 2024)
हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजेपासून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी होणार आहे.
आषाढी एकादशी शुभ योग ! (Devshayani Ekadashi 2024 Shubh Yog)
देवशयनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग असणार आहे. सकाळी 7.04 पर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे.
पूजा साहित्य
विठ्ठल रुक्मिणी मूर्ती
पाणी
पंचामृत
चंदन आणि हळद मिश्रित पाणी
हळद कुंकू
अष्टगंध
बुक्का
तुळशी पत्र
नवीन वस्त्र
5 फळं
विडाचे पान
सुपारी
तांदूळ
गुलाब फल
केळी
अगरबती
कापूर
अशी करा घरच्या घरी पूजा !
आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठुराच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा.
हेसुद्धा वाचा - Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?
विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)