Astro Tips For Tulsi: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्वं आहे. भारतातील प्रत्येक घरात तुम्हाला तुळशीचं वृदांवन दिसेल. सकाळी उठल्यावर महिला तुळशीची पूजा करतात आणि मग घरातील कामाची सुरुवात करतात. भारतातील अनेक घरांमध्ये आजही महिला ही परंपरा जपतात. तुळशीला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी तुळशीजवळ देवा लावून पूजा-अर्चा केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योषिसशास्त्रानुसार सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. असे केल्याने घरात नेहमी सुख-समृद्धी राहते.पण ज्योतिष शास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाशी संबंधित काही उपाय आणि युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. हे उपाय केल्यास देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि अपार संपत्ती देते. (astro tips for tulsi magical mantra For Money)


तुळशीपूजनात हा मंत्र वाचा


ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीपूजनाच्या वेळी एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी सर्व मनोकामना पूर्ण करते असं म्हणतात. तसंच, ती नेहमी घरात राहते आणि अशा कुटुंबात कधीही पैशाची कमतरता राहत नाही. तुळसी पूजेच्या वेळी जपला जाणारा हा प्रभावी मंत्र आहे - 'महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते'. पूजेनंतर तुळशीमातेसमोर आसन ठेऊन या मंत्राचा 108 वेळा जप करणे उत्तम मानलं जातं. 


प्रत्येक समस्या दूर होते


तुळशीपूजेदरम्यान या मंत्राचा जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात. घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते. माँ लक्ष्मी नेहमी दयाळू असते. मात्र तुळशीच्या रोपाबद्दल काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या रोपाला कधीही हात लावू नका. तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या हातांनी स्पर्श करू नका. रात्री किंवा रविवारी तुळशीची पाने तोडू नका. एकादशीलाही तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये, पाणी अर्पण करू नये किंवा पाने तोडू नयेत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)