Budhadiya Yog: वृश्चिक राशीत सूर्य-बुध यांची युती, या राशींचं पालटणार नशीब
Budha Surya Gochar: नवग्रहातील प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. गेल्या चार दिवसात बुध आणि सूर्य या ग्रहांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
Budhaditya Rajyog Positive Effect: ज्योतिषशास्त्रातही ग्रहांची युती आणि आघाडी महत्त्वाची असते. एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले की शुभ अशुभ योग तयार होत असतात. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. गेल्या महिन्यात तूळ राशीत एकापेक्षा जास्त ग्रह एकत्र आले होते. आता काही ग्रहांचा गोचर कालावधी पूर्ण झाल्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. बुध आणि सूर्य ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने 14 नोव्हेंबरला बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला होता. त्यानंतर 16 नोव्हेंबरला सूर्यदेवांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहेत. त्यामुळे सूर्य आणि बुध ग्रह वृश्चिक राशीत एकत्र आले आहेत. त्यामुळे बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) तयार झाला आहे. यामुळे तूळ, मकर आणि मीन राशींना चांगलं फळ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात
तूळ राशीवर होणारा प्रभाव (Tul Rashi)- तूळ राशीसाठी हा योग फलदायी ठरणार आहे. या राशीच्या दुसऱ्या स्थानात हा योग तयार होत आहे. हे स्थान धन आणि वाणीचं स्थान मानलं जातं. त्यामुळे या काळात अचानक धनलाभ होऊ शतो. तसेच व्यापार आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. मार्केटिंग, मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल.
मकर राशीवर होणारा प्रभाव (Makar Rashi)- या राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोग फलदायी ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल काळ आहे. व्यापाऱ्यात मोठा करार निश्चित होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळू शकतात. तसेच अडकलेली कामं मार्गी लागतील.
बातमी वाचा- मंदिरात गेल्यावर तुम्ही प्रदक्षिणा घालता! कोणत्या देवासाठी किती परिक्रमा, जाणून घ्या
मीन राशीवर होणारा प्रभाव (Meen Rashi)- गोचर कुंडलीच्या नवव्या स्थानात बुधादित्य राजयोग तयार होत आहे. हे स्थान भाग्य आणि विदेशवारीबाबत मानलं जातं. त्यामुळे सूर्य आणि बुध या दोन ग्रहांच्या युतीची साथ मिळेल. या काळात कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग असेल. उच्च पदस्थ नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थावर मालमत्तेचे वाद या काळात सुटतील.