मुंबई: आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जसे चढ-उतार येतात. प्रत्येक दिवस आपल्यासाठी एकसारखा नसते. कधी आनंद तर कधी संकटांचा डोंगर घेऊन येत असतो. त्याच प्रमाणे कधीकधी संकटांनंतर आनंदाचे क्षण येत असतात. कधी आर्थिक चणचण तर कधी भरभराट होत असते. कोणतीच वेळ एकसारखी राहात नाही. पुढे 8 दिवस मात्र काही राशींसाठी खूप आनंदाचे राहणार आहेत. याचं कारण म्हणजे या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची कृपादृष्टी असेल असं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार येत्या 8 दिवसात 5 राशींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूपच चांगला असणार आहे. तूळ राशीत शुक्र 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत राहील. 5 राशींवर लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद असणार आहे. शुक्र ग्रह भौतिक सुख, विवाह, सौंदर्य यांचा कारक आहे आणि जेव्हा शुक्र चांगल्या स्थितीत असतो तेव्हा देवी लक्ष्मी त्या राशींवर प्रसन्न असते असंही सांगितलं जातं. 


कर्क- कर्क राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे 8 दिवस खूप चांगले असणार आहेत. लक्ष्मीची कृपा असणार आहे. या काळात आपल्याला आर्थिक फायदा होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. पार्टनरसोबत वेळ चांगला जाईल. तुमची कामं मार्ग लागतील.


कन्या- कन्या राशीच्या लोकांसाठी पुढचे 8 दिवस आनंदाचे असणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुख समाधान राहील. करियरमध्ये चांगली प्रगती होईल. 


तुळ- शुक्र ग्रहाचा आपल्या राशीवर चांगला प्रभाव आहे. येत्या 8 दिवसांमधील कालावधी हा आपल्यासाठी मिळालेल्या वरदानापेक्षा कमी नसेल. पार्टनरसोबत खूप चांगला वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. 


धनु- या राशीच्या लोकांसाठी पुढचे आठ दिवस आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. आपल्यासाठी शुभ वेळ असेल. कामात चांगली प्रगती होईल.


कुंभ- पैसा, मान सन्मान आणि कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळेल. कौटुंबिक जीवन चांगलं राहील. प्रमोशन होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होणार आहे. 


(सूचना- या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही.)