Shani Rahu and Surya Inauspicious Yoga :  ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राशी संबंध एक शास्त्र आहे. ज्यात तुम्हाला ग्रह आणि नक्षत्राच्या आधारे भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल भाकीत केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात अनेक ग्रह आणि नक्षत्र आपली स्थिती बदलत असतात. श्रावण महिना हा सणासुदीचा असून या महिन्यात राहू, सूर्य आणि शनि यांच्या हालचालीमुळे दोन अशुभ योग निर्माण होणार आहे. सूर्य आणि शनि यांच्या संयोगातून समसप्तक योग तर सूर्य आणि राहू यांच्यामुळे पडाष्टक योगाची निर्मिती होणार आहे. या दोन अशुभ योगाचा सर्व राशींवर याचा परिणाम होणार असून 5 राशींवर संकट कोसळणार आहे. 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अशुभ योगामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दोन्ही समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी तणावाचा सामना करावा लागणर आहे. विरोधक वरचढ ठरणार आहेत. पैशाचा ओघ कमी झाल्याने कौटुंबिक कलहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. 


कर्क (Cancer Zodiac)   


हा काळ तुमच्या कौटुंबिक संबंधांसाठी वाईट ठरणार आहे. जमिनीच्या वादावरून मोठा भाऊ किंवा बहिणीशी भांडण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांवर परिणाम होणार आहे. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या जीवनसाथीसोबत भांडण होण्याची दाट शक्यता आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


प्रवासात तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमचं सामान किंवा मोबाईल फोन चोरीला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी संवादाशी संबंधित समस्या त्यांच्या करिअरमध्ये अडथळा ठरणार आहे. नोकरदार लोक मानसिक तणावाखाली असणार आहेत. अधिकारी तुमच्यावर नाराज असणार असून तुमचा स्वाभिमान दुखावला जाणार आहे. घरात अशांततेचे वातावरण असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2024 : यंदा रक्षाबंधनावर अशुभ भद्र आणि पंचकाची सावली; राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय?


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


पैशाचा अपव्यय या काळात वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी मान सन्मानाला धक्का लागणार आहे. सहकाऱ्याशी भांडण होऊ शकतं. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा येण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे जास्त खर्च होणार आहे. मुलांच्या शिक्षणात अडथळे आल्याने पालक चिंतेत राहणार आहेत. 


मीन  (Pisces Zodiac)  


विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत नापास होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. मन निराश राहणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता आहे. जीवनसाथीसोबत मतभेद वाढणार आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांची सामाजिक प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता आहे. पैशाचा खर्च अचानक वाढणार आहे. व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)