मेष : दिवस ठिकठाक जाईल. कोणता तरी सकारात्मक विचार तुम्हाला मदत करेल. विचार केलेली कामे किंवा योजनेत तुम्ही स्वत:च बदल कराल. करियरमध्ये नवी संधी मिळण्याचे योग आहेत. राहिलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्या. कोणतेही प्रकरण सकारात्मक राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : नोकरदार वर्गाला नव्या आणि चांगल्या संधी मिळू शकतील. तुम्हाला जे काही करायचे आहे त्यामध्ये नवे मित्र तुम्हाला मदत करतील. प्रवास फायदेशीर ठरेल. भाऊ किंवा जोडीदाराच्या यशामुळे आनंद मिळेल. नशीबाची साथ मिळाल्याचा फायदा होईल. लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल आदर वाढेल. नोकरी बदलायचा विचार डोक्यातून काढून टाका.


मिथुन : सध्या ज्या स्थितीचा तुम्ही सामना करताय. त्यामुळे तुम्हाला फायदा पोहोचेल. जर विचार सकारात्मक असतील कर कामाच्या पद्धतीत देखील बदल जाणवतील. सर्व काही ठिक होईल. पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. पगार वाढवण्याच्या अनेक संधी येतील. यामुळे तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. हल्ली काही नवीन मित्र भेटतील. तुम्ही तुमच्या आवडीचे किंवा मनाला वाटेल ते काम कराल.


कर्क : प्रयत्न कराल तर सर्वकाही सुरळीत पार पडेल. घरपरिवारातील प्रकरणात तुमचे मन सांगेल तेच कराल. आपल्या जबाबदाऱ्यांकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. जी तुम्हाला समस्या वाटतेय तीच गोष्ट काही दिवसांनी सकारात्मक होईल. तुमच्या काम करण्याची उर्जा वाढत आहे. याचा उपयोग विचारपूर्वकच करा. करियरमध्ये प्रगती करण्याची संधी आहे. ऑफिसमध्ये तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या प्लानिंगमध्ये असाल.


सिंह : खूप दिवसांपासून अडकलेले काम मार्गी लागेल. कामकाजात लक्ष लागल्याने नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्याची शक्यता आहे. आजुबाजूचे काही लोक तुमच्यावर विश्वास दाखवतील. काही खास काम पूर्ण करण्यासाठी वेळ कमी पडेल. आराम करण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. वरिष्ठांकडून आज तुम्हाला मदत मिळेल. 


कन्या : विदेश किंवा दूर कुठूनही आनंदाची बातमी मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. मित्रांना तुमच्या मदतीची गरज लागेल. काही खास नाती आणखी मजबूत होतील. आज तुम्ही काही चांगल्या योजना आखण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण कराल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक देखील वाढेल. योजना यशस्वी होऊ शकतील. नोकरी किंवा व्यवसायातील टार्गेट पूर्ण होतील. 


तुळ : कोणतेही चांगले काम करण्याआधी एकदा पुन्हा विचार करा. रोमॅंटीक विचारात गुंग राहाल. परिवारातील सदस्यांची मदत मिळेल. जवळची नाती तुमच्यासाठी खूप खास राहतील. जवळच्या लोकांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. कोणत्या जुन्या मित्राला भेटण्याचा योग आहे. तुमचे आकर्षण वाढेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. कनिष्ठ वर्गातील कर्मचारी तुमच्यावर खुश असतील. त्यांची मदत मिळेल. 


वृश्चिक : पद, पगार वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या तरी मित्राची भेट खूप काही शिकवून जाईल. नोकरी किंवा व्यवसायत कोणी असा सल्ला देईल की वेळच बदलून जाईल. अनेक प्रकरणे सहज सुटतील. कोणत्या तरी मोठ्या किंवा महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. विचारपूर्वक काम करावे लागेल. वैवाहीक जीवनात सुधार होईल. वडीलांच्या मदतीने मोठी कामं पूर्ण होतील. 


धनु : व्यवसायात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. विचार केलेली कामे पूर्ण होतील. काही प्रकरणांची खोली समजण्याच्या राहाल. नवी नोकरीही मिळू शकते. सध्याच्या नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या व्यवसाय, नोकरीत फायदा मिळू शकतो. कोणाचा सल्ला घ्याल तर समस्या सुटण्यास सोपी जाईल. आज तुम्ही काही प्रकरणात यशस्वी व्हाल. 


मकर : जुन्या प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. अनेक प्रकरणांत तुम्ही समजुतदारी दाखवाल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. कोणतेही काम करण्यापूर्वी मित्र किंवा अनुभवी लोकांच्या भेटी घ्या. व्यवसायात काही नवे करण्याची इच्छा होईल. नोकरदार वर्गाला जुन्या त्रासापासून मुक्ती मिळेल. 


कुंभ : जवळची माणसे तुमच्या मदतीसाठी तयार असतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव साऱ्यांवर पडेल. पैशांची कमतरता जाणवेल. सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना बदल जाणवतील. नव्या माणसांच्या भेटीगाठी होतील. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. मोठ्या योजना आखण्यापेक्षा केवळ कामावर लक्ष द्या. महत्त्वाच्या प्रकरणावर विचार होऊ शकतो. व्यवसायात फायदा मिळण्याची शक्यता आहे.  


मीन : धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामकाजात मेहनत जास्त लागेल पण गती येईल. कोणालातरी मोठी मदत कराल. तुमच्या मनात खूप चांगले विचारही येऊ शकतात. जुन्या आठवणी आठवून तुम्ही आनंदी व्हाल. जमीनीच्या विक्रीतून फायदा होण्याचा योग आहे. नशिबाची साथ मिळेल. पैशांशी संबंधित अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.