Saturn Near Earth 2023 : अंतराळातील सर्वात सुंदर आणि अद्भूत नजारा आज खगोलप्रेमींना पाहता येणार आहे. वादळी कड्यांमुळे अतिशय विलोभनीय असलेल्या शनी ग्रहाला दुर्बिणीने पाहता येणार आहे. शनी पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असेल त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसणार आहे. सूर्यमालेत वर्षातून एकदा हा नजरा पाहता येणार आहे. हा नजारा पाहण्यासाठी आज तुम्ही दुर्बिणी तयार ठेवा. तुम्ही आज शनीला त्याच्या तेजस्वी रिंगासह पाहता येणार आहे. आज सूर्य, शनी (Shani Surya) आणि पृथ्वी एका रंगात असणार आहे.  (Astronomical Event 2023 )


'शनी' जवळून देणार दर्शन!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विज्ञान प्रसारक सारिका घारू यांनी अवकाशातील या अद्भूत घडामोडीबद्दल सांगितलं आहे. आज पृथ्वी सूर्य आणि शनिच्या दरम्यान येणार आहे. शनि, पृथ्वी आणि सूर्य हे तिघेही एका सरळ रेषेत दिसणार आहे. या स्थितीला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. सारिकाने सांगितलं की, भारतीय वेळेनुसार ही घटना रविवारी म्हणजे 27 ऑगस्टला आज दुपारी 1.50 वाजता घडणार आहे. पण ते सूर्यास्तानंतर पूर्व दिशेला दिसू शकतं. शनि रात्रभर आकाशात फिरताना दिसेल आणि सकाळी सूर्योदयापूर्वी पश्चिमेला मावळेल. (Astronomical event sky on sunday 27 august saturn earth sun will be seen in straight line Astrology Shani Surya)



शनि आपल्यापासून 131 कोटी किमी दूर


सारिका घारू यांनी सांगितलं की, या स्थितीतही शनीचं पृथ्वीपासूनचं सुमारे 131 कोटी नऊ लाख किमी अंतरावर असणार आहे. शनीच्या प्रकाशाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 73 मिनिटं लागणार आहे. तर शनिची अंगठी 8.2 अंशाच्या कोनात वाकलेली दिसणार आहे. शनि आणि सूर्य यांच्यातील अंतर पृथ्वीच्या तुलनेत साडेनऊ पट जास्त असणार आहे. वर्षातून एकदाच घडणारी खगोलीय घटना पुढील वर्षी 8 सप्टेंबर 2024 ला पाहायला मिळणार आहे.



ज्योतिषशास्त्रानुसार काय होणार 


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे शनि पृथ्वीच्या जवळ आल्याने सकारात्मक परिणाम दिसणार आहे. तर शनीची तिसरी राशी देवगुरु गुरूवर आणि सातवी राशी सूर्य आणि बुधवर असते. ज्योतिषशास्त्रानुसार आजच्या दिवशी शनिदेवाची उपासना केल्यामुळे मानसिक त्रास दूर होतात असं मान्यता आहे.