मुंबई : ज्योतिष शास्त्रात घरातून बाहेर पडताना काही नियम सांगण्यात आले आहेत. घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला जाताना आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा असे म्हणतात. तसेच देवाला हात जोडून जावं त्यामुळे सर्व कामे पूर्ण होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा आपण घरातून बाहेर पडताना अशा गोष्टी पाहतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. आज आपण अशाच शुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत.


अंत्ययात्रा दिसणं- घरातून बाहेर पडताना कोणाची अंत्ययात्रा दिसणं किंवा पार्थीव दिसणं शुभं संकेत मानले जातात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असं मानलं जातं. बिघडलेली कामं पूर्ण होतील. तुम्हाला जर असं काही दिसलं तर हात जोडून नमस्कार करा आणि पुढे जा.


भिकारी दिसणे- ज्योतिष शास्त्रानुसार भिकारी आपल्या घरी सकाळी लवकर घरी येणे देखील शुभ मानलं जातं. असे मानले जाते की भिकाऱ्याला दान केल्याने तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो.


वाटेत गायी दिसणं- घरातून काही महत्त्वाच्या कामासाठी जाताना किंवा परदेशात जाताना गाय दिसली तर ती शुभ मानली जाते. तसेच लहान मुलाला दूध पाजणारी गाय पाहणे खूप शुभ मानले जाते. 


मंदिरात घंटा किंवा शंखध्वनीचा आवाज- असे मानले जाते की घरातून बाहेर पडताना शंख किंवा घंटाचा आवाज आला तर ते देखील शुभ मानले जाते. असे झाले तर समजा देवाची कृपा तुमच्यावर होणार आहे.