Ayodhya Ram Mandir opening Ceremony : आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच जर तुम्हाला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामाचा आशीर्वाद मिळाला तर तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धीची कमतरता नाही. स्वप्नात रामाचे दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हालाही स्वप्नात  श्रीरामांचे दर्शन झाले असेल तर स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात श्री रामच्या दर्शनाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री झोपल्यानंतर नक्कीच काहीतरी स्वप्न पडत असतात. काहीजणांना तर सकाळी तेच स्वप्न आठवत देखील नाही. स्वप्न शास्त्रानुसार, झोपताना पाहिल्या गेलेल्या प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो, ज्याला वेळीच ओळखून एखादी व्यक्ती कोणत्याही अप्रिय घटनेपासून स्वतःला वाचवू शकते. त्याचप्रमाणे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात प्रभू श्रीराम यांचे दर्शन झाले असेल तर त्याचा तुमच्या जीवनावर थोडा प्रभाव पडू शकतो. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात रामलल्लाला पाहिले असेल तर त्याचा तुमच्या जीवनावर चांगला परिणाम होईल.  


हिंदू धर्मात स्वप्न शास्त्राला विशेष महत्त्व असून स्वप्नात देवी-देवतांचे दर्शन होणे खूप शुभ संकेत समजले  जातात. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांची मूर्ती विराजमान होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वप्नात रामाचे दर्शन म्हणजे तुम्हाला प्रभू रामाचा आशीर्वाद आहे. ही स्वप्ने सूचित करतात की तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगले घडणार आहे.  याचा अर्थ असा की, तुम्ही लवकरच यथाच्या पायऱ्या चढणार आहात. जर तुम्ही एखाद्या गंभीर समस्येत अडकले असाल तर तुम्ही लवकरच त्या समस्येवर मात करु शकतात. श्रीरामाचे स्वप्न म्हणजे सर्व संकटांपासून रक्षण करु शकते. 


राम मंदिराचे स्वप्न पाहणे


हे स्वप्न तुम्हाला संकटांपासून मुक्त करेल. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात रामाचे मंदिर पाहिले असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ चिन्ह असू शकते. वर्षानुवर्षे रखडलेले तुमचे काम आता पूर्ण होईल. तुमच्या सर्व समस्या दूर होतील. तुम्ही ठरवलेले ध्येय पूर्ण होईल. 


प्रभू श्रीराम आणि हनुमान


तुम्हाला स्वप्नात प्रभू श्रीराम आणि हनुमान एकत्र दिसले तर हे स्वप्न तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या स्वप्नाचा अर्थ असा की, देवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व गुंतागुंती सुटत तुम्ही प्रगती करणार आहे.  



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)