Baba Venga Predictions: बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वांगेच्या (Baba Vanga) भविष्यवाण्यांची अनेकदा चर्चा होते आणि आतापर्यंत त्यांनी केलेले अनेक भाकीत खरे ठरले आहेत. पण आता त्यांच्या प्रमाणेच अवघ्या 19 वर्षांची मुलही भाकितं करत आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने केलेली अनेक भाकितं खरी देखील ठरले. तिने 2022  वर्षासाठी 28 मोठे भाकीत केले होते, त्यापैकी 8 खरे ठरले आहेत. त्यामुळे या मुलीची तुलना बाबा वेंगा यांच्याशी केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 साठी 19 वर्षीय हाना कॅरोलने केलेल्या मोठ्या भाकितांपैकी एक म्हणजे ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचं निधन होणार. आतापर्यंत हाना कॅरोलचे 8 भाकितं खरी ठरली.  (Baba Vanga Prediction)


हॅरी स्टाइल्स आणि बेयॉन्स याचं नवं एल्बम, रिहानाची प्रेग्नेंसी आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा - निक जोनस यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन. तर दुसरीकडे कार्दशियन कुटुंबासाठी केलेल्या अनेक भाकितांमुळे कुटुंबाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या आहेत. (Hannah Carroll)


नुकताच हाना कॅरोलने केलेली एक भविष्यवाणी खरी ठरली आहे. पॅट डेव्हिडसन आणि किम कार्दशियन वेगळे झाले तेव्हाच हानाचा एक अंदाज खरा ठरला. तिने किम आणि माजी पती कान्ये वेस्ट यांच्यातील नातेसंबंधात फूट पडण्याचा अंदाज देखील वर्तवला होता. तो देखील खरा ठरला. (Hannah Carroll Prediction)



बल्गेरियाच्या बाबा वांगा यांनी 20 व्या शतकात अनेक भविष्यवाण्या केल्या आणि आता लोक हॅना कॅरोलला 21 व्या शतकातील बावा वेंगा म्हणून संबोधत आहेत. तिने आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केली आहे. 


हॅना म्हणते की तिला पॉप कल्चर आणि सेलेब्समध्ये जास्त रस आहे, म्हणूनच तिचे बहुतेक अंदाज सेलिब्रिटींबद्दल असतात. यंदा तिचे कोणतेही भाकीत खरे ठरले नाही, तर येत्या काही वर्षांत ते नक्कीच खरे ठरेल, असे हाना म्हणते.