Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांच्या भाकीताने बसेल शॉक, भविष्यात असं असेल जग...
जाणून घ्या बाबा वेंगा यांची भाकीतं
मुंबई : जगभरात प्रसिद्ध असलेल्या फ्रान्सचा भविष्यवेत्ता नास्त्रदेमस आणि बल्गेरियाच्या दिवंगत 'भविष्यवक्ते' बाबा वेंगा पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आले आहेत. 2022 मध्ये आतापर्यंत बाबा वेंगा (Baba Vanga Prediction 2022) यांनी केलेल्या 2 भविष्यवाण्या खरी ठरल्या आहेत. त्यामुळे 2023 साठी त्यांनी केलेली 2 भाकीत खरी ठरली आहेत. आता 2023 त्यांनी केलेली कोणती भाकीत खरी ठरणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. खरंतर बाबा वेंगा यांनी 6 भाकीत केली होती. 2023 साठी बाबा वेंगा यांनी केलेली भाकीत वाचून तुम्हाला धक्का बसेल.
बाबा वेंगा यांनी कोणती भाकीत केलीत?
2023 मध्ये पृथ्वी कक्षा बदलेल. 2028 या वर्षात अंतराळवीर शुक्र ग्रहावर जातील. 2043 मध्ये यूरोपमध्ये एका धर्माची सत्ता असेल. 2046 नंतर माणून 100 वर्षांहून अधिक काळ जिवंत राहील. कारण अवयव सहज बदलता येतील.
वर्ष 2100 नंतर रात्र अस्तित्वात नसेल आणि कृत्रिम सूर्य पृथ्वी प्रकाशित करेल. 2130 मध्ये एलियन्समुळे, आपण पाण्याखाली राहू शकू. तर 2164 या वर्षात प्राणी माणसांसारखे दिसतील.
वर्ष 2183 पर्यंत मंगळ ग्रह एक अणुशक्ती बनेल. 2256 मध्ये, एक अज्ञात अंतराळ यान पृथ्वीवर एक रहस्यमय आजार आणेल. तसेच, 2229 मध्ये, फ्रान्समध्ये एक नवीन प्रतिकार चळवळ जन्म घेईल.
वर्ष 3797 पर्यंत पृथ्वीवरील जीवन नाहीसे होईल आणि लोक नवीन ग्रहावर राहायला जातील. वर्ष 4509 पर्यंत लोकं शेवटी देवाला भेटतील आणि बोलतील.
वर्ष 4599 मध्ये मानव अमर होईल, तर 340 अब्ज लोकसंख्येसह 4674 मध्ये सभ्यता शिखरावर पोहोचेल आणि परकीय प्राण्यांद्वारे पुनरुत्पादन सुरू होईल. 5079 या वर्षी जगाचं शेवट होईल.
111 वर्षांपूर्वी बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी अनेक भाकितं केली होती. बाबा वेंगा यांनी वर्तवलेली काही भाकीतं खरी ठरली आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात त्यांची दृष्टी गेली, पण या भविष्यवाणीमुळे बाबा वेंगा जगभर प्रसिद्ध झाले आहेत.
बाबा वेंगा यांनी केलेली 2 भाकीत ठरली खरं
बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये काही आशियाई देशांमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये पूर येण्याची भविष्यवाणी केली होती जी खरी ठरली आहे. काही काळापूर्वी ऑस्ट्रेलियात पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
तर पाकिस्तानमध्येही पुरामुळे परिस्थिती बिकट झाली होती. याचदरम्यान 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बाबा वेंगा यांनी काही शहरांमध्ये पाणीटंचाई आणि दुष्काळाचीही भविष्यवाणी केली होती. अलीकडच्या काळात पोर्तुगालला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले तर इटलीमध्ये दुष्काळाची समस्या उघड झाली.
2022 साठी बाबा वेंगा यांनी काय भाकीत केली होती?
बाबा वांगाच्या भाकितांनुसार 2022 मध्ये भारतात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बाबा वेंगा म्हणाले होते की, सन 2022 मध्ये जगातील देशांमध्ये तापमानात घट होईल आणि त्यामुळे टिड्डिचा हल्ला वाढेल. ज्याचा भारतावर परिणाम होईल आणि त्यामुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
(Disclaimer: ही स्टोरी सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. Zee 24 Taas त्याची पुष्टी करत नाही.)