February Grah Gochar: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी प्रत्येक महिन्यात ग्रहांचं गोचर होतं. सद्या फेब्रुवारी महिना सुरु होत असून या महिन्यात देखील अनेक ग्रह गोचर करणार आहे. मात्र यावेळी 2 दिवसांत तब्बल 3 ग्रह बॅक टू बॅक गोचर करणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी या 3 ग्रहांचं गोचर लाभदायक ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारी महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. यामध्ये 12 फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत प्रवेश करणार आहे. 13 फेब्रुवारीला चंद्राचं देखील गोचर होणार असून याच दिवशी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 


मेष रास (Aries)


फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी देखील अनुकूल असेल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करू शकणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. 


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांनाही या ग्रह गोचरचा फायदा होणार आहे. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे. या राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिक नवीन सौदे करू शकतात, हा काळ त्यांना शुभ परिणाम देईल. तुमचे काम पाहून वरिष्ठ अधिकारी खूश होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि कुटुंबात आनंद राहील. आर्थिक लाभ आणि यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. 


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठीही फेब्रुवारी महिना शुभ राहणार आहे. त्याचवेळी पदोन्नतीची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यावसायिकांसाठी हा महिना अतिशय शुभ राहील. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात मोठी कामगिरी करू शकता. नोकरदार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)