Bail Pola Festival in Maharashtra : सोमवती अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्येला बैल पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. पोळाबद्दल अशी आख्यायिका आहे की, कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाट खेळत होते. शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की, डाव मी जिंकला! दोघांचा वाद सुरू झाला. त्याला साक्षी होता फक्त नंदी. जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारलं, काय रे, डाव कुणी जिंकला? त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली. झालं पार्वती एकदम रागावली. तिने नंदीला शाप दिला. मृत्यूलोकी तुझ्या मानेवर 'जू' बसेल, तुला जन्मभर कष्ट होतील. शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक उमगली. (bail pola 2024 on Somvati Amavasya celebrate in mahrashtra tithi shubh muhurat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने पार्वती मातेचे पाय धरले आणि उ:शाप मागितला. तेव्हा पार्वतीला नंदीची दया आली, तिने उ:शाप दिला. शेतकरी वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील. यादिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत. तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतायेत. 


यादिवशी शेतकरी सकाळीच बैलाला स्वच्छ आंघोळ घालतात. त्याच्या शिंगाला रंग लावून बेगड लावून ते सुशोभित करतात. अंगावरही विविध प्रकारची नक्षी किंवा आकृत्या काढतात. अंगावर झूल घालतात, शिंगांना बांशिंगे बांधतात, गळ्यात घुंगरूमाळा घातल्या जातात. तर पायातही माळा घातल्या जातात. त्यांना सजवून झालं की, मग त्याची पूजा केली जाते. 


त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढतात. त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात. इतर लोकही या दिवशी मातीचे बैल तयार करुन त्याची पूजा करतात. त्यांना नैवेद्य दाखवतात. अशा तऱ्हेने या दिवशी बैलाच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. 


बैलपोळा मुहूर्त


पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. यंदा श्रावणी सोमवारी म्हणजे 2 सप्टेंबरला पहाटे 5.21 मिनिटांपासून 3 सप्टेंबरला सकाळी 7.24 मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी आहे. उदयतिथीनुसार 2 सप्टेंबरला बैलपोळा साजरा केला जाईल.


'या' पदार्थांशिवाय बैलपोळा अन् श्रावणी आमावस्या अपुरीच


श्रावणातील आमावस्येला काही पारंपरिक पदार्थ तुमचा श्रावण महिन्याचा शेवट गोड करतात.  या शुभ दिवशी पुरणपोळी, करंजी, मिक्स भाजी असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ बनवले जातात. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)