Bhaum Pradosh Vrat 2023 : भौम प्रदोष व्रताला बुधादित्यसह 3 शुभ योग! कर्ज-मंगळ दोषापासून मुक्तीसाठी करा `हे` उपाय
Bhadrapad Bhaum Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील आज प्रदोष व्रत असून त्याला मंगळ प्रदोष व्रत किंवा भौम प्रदोष व्रत असं म्हणतात. आज तीन शुभ योग जुळून आल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
Bhaum Pradosh Vrat 2023 : श्रावण महिना त्यात आज प्रदोष व्रत. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत अतिशय शुभ मानले जाते. जे व्रत मंगळवारी येतं त्याला मंगळ प्रदोष व्रत (mangal pradosh vrat 2023) किंवा भौम प्रदोष व्रत (Bhadrapad Bhaum Pradosh Vrat 2023 ) असं म्हणतात. भौम प्रदोष व्रताला भोलेनाथ आणि बजरंगबलीचा विशेष आशिर्वाद मिळवण्यासाठी पूजा केली जाते. आजच्या दिवशी पंचांगानुसार ग्रह आणि नक्षत्रांचाही विशेष असा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे यंदा व्रताचे दुहेरी लाभ होणार आहे. (Bhaum Pradosh Vrat 2023 or mangal pradosh vrat 2023 puja vidhi muhurat and mangal dosh and money upay in marathi)
भौम प्रदोष व्रत 2023 मुहूर्त (Bhaum Pradosh Vrat 2023 muhurat)
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील भौम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:30 ते 08:49 पर्यंत असणार आहे. प्रदोष व्रताला सूर्यास्तानंतर 45 मिनिटं महादेवाची पूजा करत येणार आहे.
भौम प्रदोष व्रत 2023 शुभ योग (Bhadrapad Bhaum Pradosh Vrat 2023 Shubh yoga)
भौम प्रदोष व्रताला पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग आणि बुधादित्य योग यांचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. शिवयोगात भोलेनाथाची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे.
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 06:04 - रात्री 11.01
शिव योग - दुपारी 12:14 am ते 13 सप्टेंबरला 01:12 am पर्यंत
बुधादित्य योग पूर्ण दिवस असणार आहे.
हेसुद्धा वाचा - Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 6 दिवसांनी करणार महागोचर! 'या' राशींच्या कुंडलीत पैशांचा पाऊस
भौम प्रदोष व्रत उपाय (Bhaum Pradosh Vrat upay)
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात केशर टाकून स्नान करावे. यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
या दिवशी तलाव किंवा नदीतील माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे आणि गरिबांना अन्न, कपडे दान करावे. यामुळे भोलेनाथासह हनुमानजींच्या आशीर्वाद प्राप्त होतो.
मंगळदोष मुक्तीसाठी भौम प्रदोष व्रताला मंगळदेवाच्या नामाचा 21 वेळा जप करा. या उपायाने वैवाहित जीवनातील अडचणीही दूर होतील.
या दिवशी गायीला गोड पोळी खायला घाला यामुळे नवऱ्याला दीर्घायुष्यचं वरदान मिळतं अशी मान्यता आहे.
आर्थिक समस्यासाठी भगवान भोलेनाथाला मसूरची दाळ अर्पण करा. त्याशिवाय हनुमानजीसमोर नऊ वातीचा तूपाचा दिवा लावा.
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन त्रिकोणी ध्वज अर्पण करा.
निरोगी स्वास्थासाठी शिवलिंग जलाभिषेक करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
भौम प्रदोष व्रत मंत्र (Pradosh Vrat Mantra)
ऊं नम: शिवाय
ऊं आशुतोषाय नम:
ऊं नमो धनदाय स्वाहा
ऊं ह्रीं नम: शिवाय ह्रीं ऊं
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)