Radha Ashtami 2024 : भगवान श्रीकृष्णांची पूजा राधेच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते. श्रीकृष्णांच्या नावाआधी राधेच नाव उच्चारलं जातं. श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर पंधरा दिवसांनी राधाराणीचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला बरसानामध्ये झाला. मथुरा, वृंदावन आणि बरसानामध्ये राधाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी राधेसोबत श्रीकृष्णांची पूजा केल्याने सुख, समृद्धीची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रताचं शुभ फळ प्राप्त होण्यासाठी नक्की राधाष्टमीचं व्रत कस करावं आणि या दिवशीचे शुभमुहूर्त कोणते आहेत आपण जाणून घेऊया. 


राधाअष्टमीचे शुभ मुहूर्त :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 सप्टेंबरला रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी सुरू होईल आणि 11 सप्टेंबरला रात्री 11 वाजून 46 मिनिटांनी ही तिथी संपेल. त्यामुळे राधाअष्टमी 11 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. 
राधाअष्टमीच्या पूजेचा शुभमुहूर्त 11 वाजून 02 मिनीटांनी सुरू होणार असून दुपारी 01 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे पूजेसाठी 02 तास 29 मिनिटांचा शुभमुहूर्त मिळणार आहे. 


राधाष्टमी उपाय : 


मनासारखा जोडीदार प्राप्त होण्यासाठी राधाष्टमीच्या दिवशी राधाराणीला कुंकवाचा टिळा त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना हळद, चंदनाचा टिळा लावावा. 


आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच नाव एका पानावर लिहून ते पान राधाराणीच्या चरणांवर अर्पण करावं. अशी मान्यता आहे की हा उपाय केल्यास आपल्या मनातला जोडीदार प्राप्त होतो. 


राधाष्टमीला उपवास केल्यास लक्ष्मी माता घरात वास करते आणि आपल्या मनोकामना पूर्ण करते. 


राधाष्टमीचा करावा या मंत्राचा जप : 
राधाष्टमीच्या दिवशी ॐ ह्रीं श्री राधिकायै नमः या मंत्राचा जप  108 वेळा केल्यास घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य राहतं आणि घरातील दु:ख, दारिद्र्य़ जातं. 


हेही वाचा : GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा... 


 


राधाष्टमी व्रताचा पूजीविधी: 


राधाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं. एका पाटावर 
पूजास्थळी तांब्याचा कलश स्थापन करावा. 


तांब्याचं भांड कलशावर ठेवून राधाराणींची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. 


राधाराणींची पूजा षोडशोपचार पूजा करावी. ही पूजा साधारणत: दुपारच्या वेळेस करावी. 


पूजेनंतर संकल्प करून उपवास करावा आणि एक वेळ जेवण करावं. 


श्रद्धेनुसार दुसऱ्या दिवशी सुहासिनी स्त्रिया आणि ब्राम्हणांना भोजन आणि दक्षिणा द्यावी. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)