मुंबई : तुमच्या बॉसची काम करण्याची पद्धत काय आहे, त्यांना कामाच्या बाबतीत कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे तुम्ही त्यांच्या राशीनुसार जाणून घेऊ शकता. हे सगळं जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्राची तुम्हाला मदत होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या राशीचे बॉस कसे असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : या राशीचे बॉस मागणी जास्त करतात. त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांकडून जास्तीत जास्त आउटपुट मिळवायचं असतं. हे लोक झटपट निर्णय घेतात आणि ते काम पूर्ण करण्यात गुंतून जातात.


वृषभ : या राशीच्या बॉसकडे मॅनेजमेंट क्षमता उत्तम असते. ते त्यांच्या टीमची खूप चांगली काळजी घेतात. त्यांना साहसी निर्णय घेणं आवडतं. 


मिथुन : या राशीचे बॉस कर्मचाऱ्यांना सांभाळून घेणं पसंत करतात. ते जबाबदाऱ्या वाटून देण्यावर भर देतात. ते प्रेरणादायी बॉस असल्याचे सिद्ध करतात.


कर्क : कर्क राशीचे अधिकारी भावनिक असतात. ते नियमांपेक्षा नातेसंबंधांना महत्त्व देतात. त्याचे पूर्वीच्या कर्मचाऱ्यांशीही चांगले संबंध असतात. त्यांना वेळेआधी काम पूर्ण करणं जास्त आवडतं. 


सिंह : या राशीचे लोक मुळतच लीडर असतात. त्यांच्यात अगदी लहान वयात लीडर बनण्याची क्षमता असते. ते सहसा कुठेही असले तरी लांब डाव खेळण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना स्वत: चं कौतुक करायला आवडतं.


कन्या: कन्या राशीचे बॉस खूप मेहनती असतात. ते तपशीलात जातात आणि त्यांच्या कर्मचार्‍यांकडून तशीच अपेक्षा करतात. अशा बॉसला आनंदी ठेवणं फार कठीण असतं. चुका शोधण्यात ते पुढे असतात पण आव्हानांचा सामना करण्यात ते मागे राहत नाहीत.


तुळ: नेटवर्किंगवर काम करणं या राशीच्या बॉसला आवडतं. त्यांना प्रत्येक काम व्यवस्थित करायला आवडतं. इतरांच्या स्तुतीचा त्यांच्या मनोवृत्तीवर मोठा प्रभाव पडतो.


वृश्चिक : या राशीचे बॉस त्यांच्या कर्मचाऱ्यांवर सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. ते बहुतेक अधिकार स्वतःकडे ठेवतात. त्यांच्या कामावर आणि हेतूवर शंका घेतलेली त्यांना रुचत नाही. या राशीचे बॉस छोट्या टीमवर काम करणं पसंत करतात.


धनु: या राशीचे बॉस सतत काहीतरी बदलाच्या शोधात असतात. असे बॉस सतत एकच गोष्ट करणं टाळतात कारण ते बोर होतात.  ते त्यांच्या सचिवावर खूप अवलंबून असतात. त्यांचा स्वभाव थोडा विचित्र असतो त्यामुळे पटकन कर्मचाऱ्यांना तो समजत नाही. 


मकर: या राशीचे बॉस खूप जास्त मेहनती असतात. एकदा अधिकार दिला की तो सोडणे त्यांना आवडत नाही. त्यांना कामात उशीर झालेला तर अजिबात आवडत नाही आणि कर्मचार्‍यांकडून पूर्ण विश्वास आणि समर्पण त्यांना अपेक्षित असतं.


कुंभ: या राशीचे बॉस आपल्या टीमशी नेहमी चांगले वागतात. टीममधील सदस्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. पण एखाद्या कर्मचाऱ्याने त्यांची निराशा केली तर भविष्यात त्यांचा त्याच्यावर विश्वास ठेवण्यात कचरतात. त्यांना नेहमी गोष्टीची पूर्वतयारी केलेली आवडते. 


मीन:  या राशीचे बॉस खूप सभ्य आणि सृजनशील असतात. ते आपल्या प्रतिमेबद्दल खूप जागरूक असतात. म्हणूनच ते काही गोष्टी छुप्या पद्धतीने करतात. सहसा ते स्वत: संपूर्ण जबाबदारी घेत नाहीत आणि इतरांना देतात.


(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)