Brahma Muhurt: ब्रह्म मुहूर्ताची योग्य वेळ कोणती? यावेळी उपासना केल्याने मिळते इच्छित फळ!
जाणून घ्या ब्रह्म मुहूर्ताची योग्य वेळ कोणती? आणि त्यामुळे काय फायदा होतो.
मुंबई : ब्रह्म मुहूर्त हे अनेकांनी ऐकलं असेल. हिंदू धर्मात या वेळेला खूप महत्त्व आहे. धार्मिक शास्त्रांपासून ते ऋषीमुनी आणि मोठ्यांपर्यंत या मुहूर्ताचे वर्णन अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले आहे. हा देवांचा काळ मानला जातो. अशा वेळी उठणं माणसांसाठी सर्वोत्तम मानलं जातं. असे म्हणतात की या वेळी जो व्यक्ती उठतो, तो हुशार होतो आणि त्याचे आरोग्यही चांगले राहते. यावेळी पूजा करून देवाचे स्मरण करणे देखील चांगले मानले जाते.
वेळ
हिंदू धर्मात ब्रह्म मुहूर्त म्हणजे सकाळची वेळ. हिंदू धर्मात, सकाळी उठण्याची ही वेळ सर्वोत्तम मानली जाते. यावेळी रात्र संपून दिवस सुरू होतो. ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4 ते 5.30 अशी मानली जाते. त्याचा कालावधी दीड तासाचा आहे.
पूजा
शास्त्रानुसार हा काळ मानवासाठी जागृत होण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. अशा वेळी जागरण केल्यानं आजार दूर राहतात आणि आरोग्य चांगलं राहतं. ब्रह्म मुहूर्तावर उठून पूजा केल्यानं देव प्रसन्न होतो आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो.
हेही वाचा : 12th Fail: टेम्पो चालवला, गर्लफ्रेंडची अट आणि...! या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर येतोय चित्रपट
देवतांचे आगमन
शास्त्रानुसार प्राचीन काळापासून ऋषीमुनी यावेळी उठून स्नान वगैरे करून देवपूजेत मग्न असतात. हा काळ देवांचा काळ मानला जातो. या वेळी देव आणि पितरांचे आगमन होते, अशी श्रद्धा आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)