मुंबई : 'शादी में जरूर आणा' या चित्रपटातील 'ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी...' हे गाणं आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल. तिथे प्रेमात फसवनूक झाल्यानंतर अभिनेता आयएएस झाला, तर आता प्रेमात पडल्यानंतर आयएएसची तयारी केली आणि ओळख मिळवून दाखवली. असा चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा बनवत आहेत.
विधू विनोद चोप्रा यांनी 'परिंदा, 1942: अ लव्ह स्टोरी', 'मिशन कश्मीर' सारखे क्लासिक आणि कल्ट चित्रपट बनवले. आता विधू विनोद चोप्रा हे आयएएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहेत. '12th फेल' (12th Fail) असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटासाठी अभिनेता विक्रांत मॅसीला (Vikrant Massey) साईन करण्यात आलं आहे. अनुराग पाठक यांच्या नॉव्हेलमध्ये असलेल्या या कथेवर हा चित्रपट आहे. मात्र, हा फक्त एक चित्रपट नसून एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची क्षमता असल्याचे दाखवण्याच येणार आहे. चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे मुखर्जी नगरमध्येच झाले आहे. तिथेच मनोज शर्मा यांनी त्यांच्या काळात UPSC चा अभ्यास केला.
मनोज शर्मा यांची कहाणी खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी एक उदाहरण आहे. मनोज शर्मा यांनी कॉपी करून इयत्ता 9वी, 10वी आणि 11वी उत्तीर्ण केली होती, मात्र 12वीत कॉपी करण्याची संधी मिळाली नाही म्हणून ते नापास झाले. परिसरातील एक SDM (उप जिल्हा दंडाधिकारी) यांचे शाळेवर लक्ष होते. त्यांनी शाळेला कडेकोट सुरक्षा केली आणि कॉपी करू दिली नाही. मनोज शर्मा हे समजू शकले की एसडीएम यांच्याकडे अनेक निर्णय घेण्याचे अधिकार जास्त असतात आणि त्यांना तसंच बनायचं आहे असं ते ठरवतात.
एका मुलाखतीत मनोज यांनी सांगितले की, 12वीत नापास झाल्यानंतर जगण्यासाठी त्यांनी टेम्पो चालवला. एक दिवस त्यांचा टेम्पो पकडला गेला, म्हणून ते एसडीएमकडे गेले, जेणेकरून त्यांनी आदेश दिला तर टेम्पो सोडवता येईल. पण मनोजसोबत असे होऊ शकले नाही. त्याऐवजी, तेथे गेल्यानंतर त्यांनी एसडीएमला विचारलं की तुम्ही तुमचा अभ्यास कसा केला? मध्य प्रदेशातील मुरैना येथे राहणारे मनोज यानंतर ग्वाल्हेरला आला. पण राहायला घर नव्हतं, खायला काही नव्हतं. त्यामुळे मनोज भिकाऱ्यांजवळ झोपायचे. मग कसेबसे त्यांना एका ग्रंथपालाकडे शिपायाची नोकरी लागली.
हेही वाचा : Varun Dhawan होणार बाबा? पत्नीच्या प्रेग्नन्सीवर अभिनेत्याचं मोठ वक्तव्य
मनोज यांची अभ्यासाची आवड इथूनच वाढली. लोकांना पाणी देण्याबरोबरच ते येथे सुरू असलेले कार्यक्रमही ऐकत असत. वाचनालयात ठेवलेली पुस्तकं वाचा. अब्राहम लिंकन, गोर्की, मुक्तिबोध यांसारख्या कविता त्यांनी इथे वाचल्या. पण बारावीच्या नापास शिक्क्यानं त्याची पाठ सोडली नाही. सतत अभ्यास करूनही मनोज यांना बारावीत नापास झाल्याची खंत वाटायची. मनोज यांची गर्लफ्रेंड होती, ते तिला त्यांच्या फिलींग्स सांगायला घाबरत होते की खरं सांगितलं तर ती त्यांना सोडून जाईल. त्यामुळे त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला.
यानंतर मनोज दिल्लीला आले. पण पैशांची गरज होती, म्हणून 400 रुपयांत लोकांच्या कुत्र्यांना फिरवण्याचे काम केले. त्याचबरोबर यूपीएससीची तयारी सुरू केली. मनोज पहिल्याच प्रयत्नात प्री-पास झाले, पण उरलेल्या प्रयत्नात अपयशी ठरले. यानंतर, ते चौथ्यांदा प्री क्लिअर करू शकले आणि मेन परिक्षा द्यायला गेले. प्रेमामुळे ते दोनदा नापास झाले तर चौथ्यांदाही प्रेमामुळे पास झाला, असे मनोज यांनीं मुलाखतीत सांगितले.