Budh Gochar In July 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदलत असतो. चंद्र ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलत असतो. तर शनि ग्रह अडीच वर्षानंतर राशी बदलतो. जुलै महिन्यात पाच ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. बुध ग्रहाचं संक्रमणही या महिन्यात होणार आहे. बुध ग्रह जुलै महिन्यात तीन वेळा राशी बदल करणार आहे. बुध गोचराचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. काही राशींना शुभ तर काही राशींना या काळात अशुभ फळं मिळतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध ग्रहाने 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यानंतर 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 01 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर बुध ग्रह याच महिन्यात 31 जुलै रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 


सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी बुध बदल फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.


कन्या- कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात बुध ग्रह चांगले दिवस घेऊन येईल. या काळात तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. नवीन नोकरीच्या ऑफर देखील येऊ शकतात. व्यापाऱ्यांना फायदा होईल.


मकर- मकर राशीच्या लोकांच्या मालमत्तेत वाढ होईल. करिअरमध्ये पदोन्नती होऊ शकते. कार्यशैलीचे कौतुक होईल. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याची पुष्टी ZEE 24 TAAS करत नाही.)