बुध गोचर 2023 : 7 फेब्रुवारीपासून `या` 5 राशींचं भाग्य उजळणार; मिळेल मोठी संधी, भरपूर पैसा!
Budhaditya Yog in Makar 2023 February : फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आणि बुध हे प्रेमाचा ग्रह...7 फेब्रुवारी 2023 नंतर म्हणजे उद्या मंगळवारी बुधाचे मकर राशीत संक्रमण होणार आहे. हे संक्रमण 5 राशीच्या लोकांना छप्पड फाड लाभ घेऊन येणार आहे.
Budh Gochar 2023 in Makar : नवीन वर्ष हे ग्रहांच्या संक्रमणासाठी खूप महत्त्वाचा आहे. या वर्षीची सुरुवातच शनि ग्रहाच्या संक्रमणाने झाली. तर फेब्रुवारी महिना प्रेम युगुलांसोबत ग्रहांसाठी पण खास आहे. या महिन्यात बुध, शुक्र आणि सूर्य ग्रहांचे भ्रमण होणार आहे. दुसरीकडे, सूर्य आधीच मकर राशीत आहे आणि 7 फेब्रुवारी 2023 रोजी बुध ग्रह देखील संक्रमण करणार आहे. अशाप्रकारे, शनिच्या मकर राशीत बुध आणि सूर्याचा संयोग बुधादित्य योग तयार करणार आहे. त्यामुळे या ग्रहाचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. पण हा बुधादित्य योग 5 राशींसाठी अतिशय शुभ सिद्ध होणार आहे.
बुधादित्य योगाचा छप्पड फाड लाभ
मेष (Aries)
या महिन्यात येणारा बुधादित्य योग या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर करिअरमध्ये मोठी संधी मिळणार आहे. तर व्यावसायिकांसाठीही हा काळ शुभ वार्ता घेऊन येणार आहे. अगदी नवीन घर किंवा कार खरेदीचे योग आहेत.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांना घवघवीत यश प्राप्त होणार आहे. छप्पडफाड धनलाभ होणार आहे. जर तुम्हाला नवीन काम सुरु करायचं असेल तर ही सुवर्ण संधी आहे. शिवाय तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण असणार आहे.
हेसुद्धा वाचा - व्हॅलेंटाईन वीकमध्ये तूळ आणि धनु राशीसह 'या' 5 राशीत असणार प्रेमच प्रेम
सिंह (Leo)
सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बनलेला बुधादित्य योग हा सिंह राशीच्या लोकांना अतिशय लाभदायक ठरणार आहे. सासरच्या लोकांकडून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. समाजात आदर वाढेल.
तूळ (Libra)
बुधाच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार. मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण निकाली लागेल. त्यानंतर तुमच्यासाठी यशाची दारं उघडी होतील. प्रत्येक कामात तुम्हाला नफा मिळणार आहे.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी बुधाचं संक्रमण आनंदच आनंद घेऊन आला आहे. नोकरीत बढती मिळेल आणि पगार वाढेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)