Mercury Rise In Aries in marathi : कुंडलीतील ग्रह आपलं भाग्य ठरवतं. कुठला ग्रह (Astro news) कुठल्या घरात आहे, कुठला ग्रह कुठल्या राशीत प्रवेश करतोय यावर आपल्या भविष्यची वाटचाल ठरते. मार्च महिन्यात शुक्र, शनि आणि बुध ग्रहाचं गोचर (Planet transit in March 2023) होणार आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. सर्वात बुद्धिमान आणि जिज्ञासू अशा या ग्रहाचे संक्रमण होतं तेव्हा तो काही राशीसाठी राजयोग घेऊन येतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा 31 मार्चला मेष राशीत प्रवेश (Budh ka Mesh Rashi mein Gochar 2023) करणार आहे. त्यामुळे 5 राशीच्या लोकांनाच्या नशिबात धनलाभ आहे. चला तर मग जाणून घेऊयात कुठल्या राशींचं भाग्य चमकणार ते..(Budh Gochar 2023 Mercury Rise In Aries 31 March 2023 Rajayoga for the people of these 5  Zodiac Signs in marathi )


कर्क (Cancer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी बुध गोचर खूप भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. करिअरच्या आलेख हा चढता राहणार आहे. परेदशवारीचा योग आहे. यशासोबतच समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. एकंदरीत बुध गोचर तुमच्यासाठी यशदायी ठरणार आहे. 



वृश्चिक (Scorpio)


या राशीसाठी बुध गोचर प्रगतीचे अनेक मार्ग उघडे करणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा उत्तम काळ असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगलं यश मिळणार आहे. मात्र या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. 


मेष (Aries)


या राशीच्या लोकांसाठी हा काळ धनसंपदा आणि यश घेऊन आला आहे. ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सर्वोत्तम ठरणार आहे. अनेक क्षेत्रात गुंतवणुकीचे मार्ग उघडे होणार आहे. मात्र कामाच्या वाढत्या ताणामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 


कुंभ (Aries)


या राशीच्या लोकांना त्यांचा मेहनतीचं फळ बुध गोचर काळात मिळणार आहे. नोकरदारवर्गातील लोकांची पदोन्नतीसह वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचे लव्ह लाइफ चमकणार. त्यांचा लग्नाचा मार्ग मोकळा होणार आहे. विवाहित जोडप्याचा घरी गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या लोकांनी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या उद्योगपतींच्या नशिबात चांगले पैसे आहेत. या काळात मोठं मोठं करार होती. या राशीच्या लोकांच्या नशिबात धनलाभ आहे. अनेक मार्गातून तुमच्याकडे पैसे येतील. तर लव्ह लाइफ तुमची रोमाँटिक राहणार आहे. या राशीच्या लोकांना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)