Budh Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर एक ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो. त्यानुसार बुध ग्रह 25 जुलै रोजी पहाटे 4.26 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध हा तर्क, बुद्धीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने सिंह राशी प्रवेश केल्यानंतर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम मिळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असंच बुध सिंह राशीत प्रवेश करत असताना काही राशीच्या लोकांना थोडं सावध राहण्याची गरज आहे. बुधाच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे, ते पाहूयात.


मेष रास


या राशीमध्ये बुध पाचव्या भावात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. या काळात मुलांच्या भविष्याबाबतही तुम्ही थोडे चिंतित होऊ शकता. व्यवसायात आर्थिक लाभाची व्याप्ती फारच कमी आहे. खर्च अधिक वाढणार आहे. पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या तब्येतीतही चढ-उतार असणार आहेत. कुठेही पैसे गुंतवत असाल तर काळजी घ्या.


वृषभ रास


या राशीमध्ये बुध चौथ्या भावात भ्रमण करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यताही कमी आहे. विचार न करता कोणतंही काम करणं टाळावं. तुम्ही जो काही निर्णय घ्याल ते चुकीचे ठरण्याची शक्यता आहे.


कर्क रास


बुधाच्या गोचरमुळे या राशीच्या व्यक्तींचा कठीण काळ सुरु होणार आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा थोडा जास्त दबाव असू शकतो. काही प्रकरणांमध्ये संयमाने काम करावं. व्यवसायातही नफा मिळण्याची फारशी शक्यता नाही. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळणार नाही. कुटुंबातील वाद अजूनच वाढतील. 


कन्या रास


कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अडचणींचा डोंगर उभा राहू शकतो. या राशीच्या लोकांसाठी काही समस्या वाढू शकतात. नोकरी आणि व्यवसायात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. धनहानीला सामोरं जावं लागू शकतं. यासोबतच या काळात प्रवास केल्यास नुकसान होऊ शकते.  या काळात तुम्हाला या कालावधीत कोणतेही मोठे व्यावसायिक निर्णय घेऊ नये.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )